Home /News /maharashtra /

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

N D Patil

N D Patil

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे.

  मुंबई, 17 जानेवारी: : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे.  वयाच्या 93 व्या वर्षी एन डी पाटील यांनी घेतला अखेरचा (N D Patil Passed away Senior leader took last breath at Kolhapur) श्वास.  ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते म्हणून प्रा. एन. डी .पाटील यांना ओळखले जाते.  एन.डी. पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. एन. डी. पाटील यांना मे 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

  सामाजिक, राजकीय जीवनात सर्वसामान्यांसाठी काम

  एन.डी. पाटील यांचं पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असं होतं. सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) अशिक्षित शेतकरी कुटुंबात 15 जुलै 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता.  त्यांनी एम. ए. (अर्थशास्त्र)चे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं होतं. त्यांनी 1962 मध्ये एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले. एन.डी. पाटील यांनी 1954-1957 छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. 1960 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून कामं केले आहे. तसेच त्यांनी 1962-1978 दरम्यान शिवाजी विद्यापीठ,रयत शिक्षण संस्था, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. शेकापमध्ये एन.डी. पाटील यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी काम केले आहे. 1948  साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली. तब्बल 18 वर्षे ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते. 1978 ते 1980 या काळात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. राज्यात 1999 साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. 1994 ला त्यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Kolhapur

  पुढील बातम्या