माझी मुलं राजकारणी नाही तर 'शेतकऱ्यांची' मुलं- गडकरींचा काँग्रेसला टोला

माझी मुलं राजकारणी नाही तर 'शेतकऱ्यांची' मुलं- गडकरींचा काँग्रेसला टोला

तसंच ती राजकारणीही नाहीत असं म्हणत नितीन गडकरी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. ते बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

  • Share this:

अकोला,17 डिसेंबर:  माझी मुलं  म्हणजे शेतकऱ्याची मुलं आहे असं वक्तव्य आज केंद्रीय परिवहन मंत्री  नितीन गडकरी यांनी केलं आहे.  तसंच ती   राजकारणीही  नाहीत असं म्हणत  नितीन गडकरी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. ते बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या  उद्घाटन समारंभात बोलत होते.

बाकीचे नेते आपल्या मुला-बाळाचा विचार करतात, पण माझी मूल राजकारणात नाही. तिकीटही मागणार नाहीत. माझी मुलं म्हणजे शेतकऱ्यांची मुलं  आहेत.  मी ठरवलं आता शेतकरी, सोयाबीन, कापूस, गहू, तांदूळ लावणार नाही. तर शेतकरी पेट्रोल डिझेल लावेल. शेतातील सर्व प्रकारच्या कुटारपासून बायो इथॅनॉल, बायोसेट तयार करा. आता इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमचे पंप नाही तर शेतकऱ्यांचे पंप या देशात दिसतील असंही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.   'ज्या प्रकारचा भ्रष्टाचार जुन्या सरकारने केला. त्यांनी स्वतःच्या तिजोऱ्यांचं सिंचन केलं , मात्र शेतीचं सिंचन केलं नाही. म्हणून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली' असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात  मागील सरकारवर केलाय.

First published: December 17, 2017, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading