'माझी बहीण वाघीण होती, तिची बदनामी थांबवा अन्यथा...'; पूजा प्रकरणात दिव्याची आक्रमक प्रतिक्रिया

'माझी बहीण वाघीण होती, तिची बदनामी थांबवा अन्यथा...'; पूजा प्रकरणात दिव्याची आक्रमक प्रतिक्रिया

यावेळी पूजाच्या आईने पहिल्यांदा माध्यमासमोर प्रतिक्रिया दिली आहे

  • Share this:

बीड, 26 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणात दररोज नवे नवे फोटो आणि ऑडिओ समोर येत असल्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चिलं जात आहे. दरम्यान पूजा चव्हाण हिच्या आईने प्रथमच माध्यमाशी संवाद साधला. मुलीबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माझ्या मुलीची बदनामी केली जात आहे, हे थांबवा अन्यथा आम्ही आत्महत्या करू असं त्या यावेळी म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण हिची बहिण दिव्या चव्हाण हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने पूजाने आत्महत्या केल्याच्या आरोपाला विरोध केला होता. एका न्यूज चॅनलशी बोलतानाही दिव्या म्हणाली की, माझी बहीण वाघिण होती. तिच्या नावाची बदनामी थांबवा. ती चांगली कार्यकर्ती होती. बीडमध्ये तिची चांगली ओळख आहे. प्रितम मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासोबतही ती काम करीत होती. यांच्यासोबतचेही तिने अनेक फोटो आहेत. ते फोटो व्हायरल का केले जात नाहीत?  असा सवाल तिने उपस्थित केला आहे. ती पुढे म्हणाली की, सध्या मी दहावीच्या वर्गात शिकत आहे. आणि पूजाविषयी सतत काहीना काही समोर आणलं जात आहे. याचा खूप मनस्ताप होत आहे. हे वेळीच थांबवलं नाही तर आम्ही आत्महत्या करू. यावेळी पूजाच्या वडिलांनीही माध्यमाशी संवाद साधला.

हे ही वाचा-'मराठी भाषा दिनासाठी सगळे नियम? संजय राठोडांसाठी नाही का?'; मनसे आक्रमक

काही दिवसांपूर्वी पुन्हा पूजा चव्हाण हिचे फोटो समोर आले होते. यामध्ये पूजा रेल्वे पुलावर केक कापताना दिसत आहे. या केकवर संजय राठोड यांचा फोटो असून त्यावर वनमंत्री असं लिहिलं आहे. याशिवाय एक लॉनमधीलही फोटो यामध्ये होते. परची टोपी घातलेले पूजा चव्हण व संजय राठोड यांचे फोटो समोर आले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: February 26, 2021, 4:46 PM IST

ताज्या बातम्या