...म्हणून मला चक्कर आली-नितीन गडकरी

...म्हणून मला चक्कर आली-नितीन गडकरी

माझी शुगर कमी झाल्यानं थोडीशी तब्येत बिघडली होती. तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर्सनं मला मदत केली. आता माझी तब्येत ठीक आहे

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

07 डिसेंबर : आज राहुरीला कार्यक्रमामध्ये गुदरमल्यासारखं झालं. त्यातच कार्यक्रमस्थळी सूट घातलेला होता, त्यामुळे हवा घेण्यास अडचण आली. त्यामुळे मला चक्कर आली. आता माझी तब्येत ठीक आहे काळजी कऱण्याचे काम नाही असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं आज अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमाला हजर होते. गडकरी यांचं भाषण झाल्यानंतर राष्ट्रगीतासाठी उभे राहिले असता अचानक त्यांना भोवळ आली आणि ते व्यासपीठावरच कोसळले. नितीन गडकरी यांना भोवळ आल्यामुळे एकच धावपळ उडाली. त्यांना तातडीनं राहुरी गेस्ट हाऊसला नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांची टीम, नगरचे आयजी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृती सुधारणा झाली. गेस्ट हाऊसवर उपचार घेतल्यानंतर गडकरी शिर्डीला पोहोचले. तिथं साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली तब्येत ठीक असून काळजी करण्याचं कारण नाही असं सांगितलं. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर गडकरी विशेष विमानानं नागपूरला रवाना झाले. नागपूरमध्ये आज संध्याकाळी एका नियोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान नितीन गडकरींनी टि्वट करून प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. "माझी शुगर कमी झाल्यानं थोडीशी तब्येत बिघडली होती. तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर्सनं मला मदत केली. आता माझी तब्येत ठीक आहे. तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

 

गडकरींची मेडिकल हिस्ट्री

- आधीपासून मधुमेहाचा त्रास

- सप्टेंबर 2001 - कारचा भीषण अपघात

- अपघातानंतर वर्षभर अंथरुणावर

- नंतर औषधांमुळे वजन वाढलं  

- सप्टेंबर 2014मध्ये वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया

 

=========================================

First published: December 7, 2018, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading