मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाविकास आघाडी सरकार लवकरच 'कबाड' होणार, पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार!

महाविकास आघाडी सरकार लवकरच 'कबाड' होणार, पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार!

 सत्ताधारी पक्ष याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. अडीच वर्षे तुम्ही काय केलं हा प्रश्न कोर्ट  विचारत आहे.

सत्ताधारी पक्ष याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. अडीच वर्षे तुम्ही काय केलं हा प्रश्न कोर्ट विचारत आहे.

'महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही.

बीड, 18 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारला (mva government) दोन वर्ष पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते सरकार पडण्याबद्दल भाकित वर्तवत आहे. आता भाजपच्या (bjp) नेत्या आणि माजी महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे(pankaja munde) यांनीही महाविकास आघाडी सरकारबद्दल भाकित वर्तवलं आहे. या सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही.राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सत्ता बदलाचे संकेत पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणातून दिले आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील जाहीर सभेत बोलत होत्या.

'महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे, त्याची सुरुवात नगर पंचायत निवडणुकीच्या विजयापासून होईल' असं पंकजा म्हणाल्या.

विराटला कॅप्टन्सीवरून हटवण्याची Inside Story, 4 महिन्यांपासून सुरू होतं ऑपरेशन!

'अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये आनंद आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यामुळे बरं वाटायला लागलं आहे, असं म्हणत म्हणत महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली.

दरम्यान,'निवडणुकीच्या प्रचार सभेत 100 कोटी ची घोषणा केली पाच नगरपंचायतला 500 कोटी आणणार असं विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलं होतं. या विधानाचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेत जोरदार पलटवार केला.

शिवरायांनी केवळ महाराष्ट्राचं नाहीतर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं-शहा

'सगळं माझ्याच गळ्यात आले पाहिजे. हे आमदार आणि पालकमंत्री यांचं सुरू आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेल मध्ये घालू सगळ्याना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबांनी शिकवलं नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले.

'धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातच स्टेटमेंट नाही, कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं, अस देखील त्या म्हणाल्या.

First published:
top videos