मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मताला प्रत्येकी तीन हजार रुपये अन् मटण वाटून लढवली होती निवडणूक' शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा गौप्यस्फोट

'मताला प्रत्येकी तीन हजार रुपये अन् मटण वाटून लढवली होती निवडणूक' शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा गौप्यस्फोट

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Shiv Sena MLA Shahajibapu Patil statement on election: निवडणुकीत पैसे वाटप केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

पंढरपूर, 19 ऑक्टोबर : निवडणुकांत पैसे वाटप, पार्टी किंवा अन्य वस्तूचं आमिष मतदारांना (Voters) दाखखवलं जातं असं बोललं जातं. मात्र, आता स्वत: आमदार साहेबांनीच हे जाहीर कार्यक्रमात कबूल केलं आहे. मताला प्रत्येकी तीन हजार रुपये वाटप केल्याचं शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Shiv Sena MLA Shahajibapu Patil) यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर मटणाच्या पार्ट्याही (Mutton Party) दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

झालं असं की, सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या (Sangola Sugar Factory) गाळप हंगामाचा कार्यक्रम रविवारी आयोजित कऱण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाषण करताना मतदारांना मटण आणि पैसे वाटप केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आमदार साहेबांनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय नेते कशाप्रकारे निवडणुकीत पैशांचा पूर आणतात आणि मतदारांना आमिष दाखवून आपल्या बाजुने मतदान करण्यास भाग पाडतात हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

नेमकं काय म्हणाले आमदार शहाजीबापू पाटील?

1998 मध्ये सांगोला साखर कारखान्याची निवडणूक होती. गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासोबतच इतरही नेत्यांनी आपले पॅनल निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत मला वाळीत टाकलं असं वाटलं. ते मताला तीन हजार रुपये दिले मी उघड सांगतो. तीन-तीन हजार रुपये मताला वाटून एकूण 57 हजार रुपये वाटून टाकले होते. तसेच मटणाच्या पार्ट्याही दिल्या होत्या असंही आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचा : पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादीतून चंद्रकांत पाटलांवर घणाघात, जयंत पाटील म्हणाले...

पैसे वाटप केल्यानंतर सर्व पॅनल पराभूत झाले आणि आपण निवडणून आलो असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं. आमदार शहाजीबापू पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात पैसे वाटप केल्याची कबूली दिल्याने एकच खळबळ उडाली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली.

आमदार साहेबांनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर अखेर आमदारसाहेबांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलं. सभासदत्व टिकावे यासाठी दिलेले योगदान आहे असं सांगत साखर कारखाना निवडणुकीत पैसे वाटपाचा संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

साखर कारखान्याच्या उभारणी पूर्वी ही निवडणूक लागली होती. या निवडणुकीत कारखान्याचे तीन हजार सभासद होते. या सर्व सभासदांचे सभासदत्व कायम रहावे यासाठी हे योगदान दिले होते असं स्पष्टीकरणही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलं आहे.

First published:

Tags: Election, Pandharpur