विश्वास नांगरे पाटलांच्या पथकाला मोठं यश, मुथुट फायनान्स दरोडाप्रकरणी दोघांना घेतलं ताब्यात

विश्वास नांगरे पाटलांच्या पथकाला मोठं यश, मुथुट फायनान्स दरोडाप्रकरणी दोघांना घेतलं ताब्यात

14 जून रोजी नाशिकच्या मुथुट फायनान्सच्या ऑफिसवर भर दिवसा दरोडा टाकण्यात आला होता.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 19 जून : मुथुट फायनान्स दरोडा प्रकरणामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात विश्वास नांगरे पाटील  यांच्या पथकाला यश आलं आहे. 14 जून रोजी नाशिकच्या मुथुट फायनान्सच्या ऑफिसवर भर दिवसा दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी 15 जून रोजी सीसीटीव्हीच्या माध्यामातून 3 मोटारसायकल, 3 हेल्मेट आणि एका व्यक्तीचा शर्ट पोलिसांच्या हाती लागला होता. त्यात आता दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नाशिकपासून 14 किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ल्याजवळून गुजरातकडे जाणाऱ्या पेठ रोडवर या गाड्या सापडल्या होत्या. दरोडा टाकतावेळी आरोपींनी गोळीबारही केला होता. त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर या प्रकरणात परप्रांतीय टोळीचा हात असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यातील संशयीत आहे. यामध्ये 8 जणांच्या टोळीत 2 स्थानिकांचा समावेश आहे. पप्प्या आणि जितेंद्र सिंग अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही गुजरातहून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत होते. पोलिसांची तब्बल 8 पथकं संशयित आरोपींच्या मागावर होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. संशयित आरोपी गुजरातला असल्याची माहिती कळताच पोलिसांनी आपला ताफा त्या दिशेने वळवला आणि 2 जणांना ताब्यात घेतलं तर इतर 4 जणांचा शोध अद्याप सुरू आहे.

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, '14 रोजी सकाळच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता. नाशिक शहराच्या उंटवाडी परिसरातील सीटी सेंटर मॉलजवळ असलेल्या मुथुट फायनान्सच्या ऑफिसवर 5 दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी त्यांनी चेहरा काळ्या कपड्याने झाकला होता.'

ऑफिसमध्ये शिरल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये संजू सॅम्युअल नावाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर यात 2 कर्मचारी जखमी झाले होते. दरोडेखोरांनी ऑफिसमधून मोठी मालमत्ता लंपास केली असल्याची माहितीही विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून देण्यात आली होती.

VIDEO : फडणवीसांना फडण20 असं म्हणायचं का? अजितदादांची तुफान फटकेबाजी

 

First published: June 19, 2019, 5:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या