आरक्षणासाठी मुस्लिमांचा पुण्यात महामोर्चा

आरक्षणासाठी मुस्लिमांचा पुण्यात महामोर्चा

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात आज मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. मुस्लिम समाजाला दिलेलं पाच टक्के आरक्षण कायम करावं ही त्यांची मुख्य मागणी होती.

  • Share this:

पुणे, ता.9 सप्टेंबर : मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात आज मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. मुस्लिम समाजाला दिलेलं पाच टक्के आरक्षण कायम करावं ही त्यांची मुख्य मागणी होती. त्याचबरोबर मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाबाबत सरकारनं पुढाकार घेत तो अन्याय दूर करावा अशीही मोर्चेकऱ्यांची मागणी होती. पुणे जिल्ह्यातल्या विविध संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला होता. या मोर्चात महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती.

गोळीबार मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात राज्यभरातून हजारो मुस्लिम बांधव सहभागी झालेत. यावेळी गोळीबार मैदान, नेहरू रस्ता, मालधक्का चौकासह इतर भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीये. यावेळी नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलयं.

मोर्चात कुठल्याही घोषणा दिल्या गेल्या नाहीत. मोर्चात सर्वात पुढे मुली होत्या. त्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते.

मुस्लिम समाजासह अनेक पक्ष, संघटनाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. अनेक अपंग, महिलाही ही मोर्चात झाल्या. आरक्षण कायम करावे या प्रमुख मागणीसह गोरक्षा, लव्ह जिहाद व अन्य कारणांमुळे मॉब लीचिंगद्वारे होणाऱ्या हत्या याचा निषेध करण्यात आला.

वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात यावीत, दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात, मुस्लिम समाजाला अ‍ॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण मिळावे अशी मागणीही मोर्चात करण्यात आली.

 

 

'हेच का अच्छे दिन?' मनसेने रिलीज केला VIDEO

First Published: Sep 9, 2018 03:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading