मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अनोखं रक्षाबंधन! मुस्लीम व्यक्तीकडून महिलेला घड्याळ भेट; वाचा व्हायरल फोटोमागची भावनिक स्टोरी

अनोखं रक्षाबंधन! मुस्लीम व्यक्तीकडून महिलेला घड्याळ भेट; वाचा व्हायरल फोटोमागची भावनिक स्टोरी

रक्षाबंधनाच्या दिवशी एक मुस्लीम व्यक्ती एका मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेच्या हातात घड्याळ बांधताना...

रक्षाबंधनाच्या दिवशी एक मुस्लीम व्यक्ती एका मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेच्या हातात घड्याळ बांधताना...

रक्षाबंधनाच्या दिवशी एक मुस्लीम व्यक्ती एका मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेच्या हातात घड्याळ बांधतानाचा (Muslim man gift watch to Mentally handicapped women) फोटो व्हायरल झाला होता. या व्हायरल फोटोमागची भावनिक स्टोरी समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

अमरावती, 25 ऑगस्ट: तीन दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) सण उत्सहात साजरा करण्यात आला आहे. हिंदू धर्मात साजरा करण्यात येणारा हा सण बहिण आणि भावाच्या अतुट नात्याचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Photo) झाले आहेत. रस्त्यावर भर उन्हात उभं राहून वाहतूक नियंत्रणात ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना राख्या बांधल्याचे भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान सोशल मीडियावर एक मुस्लीम व्यक्ती एका मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेच्या हातात घड्याळ बांधतानाचा (Muslim man gift watch to Mentally handicapped women) फोटोही वेगानं व्हायरल झाला होता. अनेकांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी आणि व्हॉट्सअॅप स्टेटसला हा फोटो ठेवला होता. पण या फोटो मागची भावनिक स्टोरी सध्या समोर आली आहे. संबंधित घटना अमरावती शहरातील मुख्य बाजारातील आहे.

हेही वाचा- काळजाला स्पर्श करणारी घटना; राखी आणली, लाडू केले पण....

नेमकं काय घडलं ?

अमरावती शहरातील मुख्य बाजरपेठ परिसरातील जवाहर रोडवर बब्बू भाई नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीचं घड्याळाचं एक छोटसं दुकान आहे. रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी एक मानसिकदृष्ट्या विकलांग असणारी महिला बब्बू भाई यांच्या घड्याळाच्या दुकानासमोर जाऊन उभी होती. यावेळी संबंधित महिला नवीन घड्याळाकडे टक लावून पाहात होती. यावेळी बब्बू भाई यांनी संबंधित महिलेला काही पैसे देऊ केले. पण संबंधित महिलेनं आपल्याला घड्याळ हवं असल्याची मागणी केली.

हेही वाचा- Raksha Bandhan : 'दादा मागच्या वर्षी आला होता,आताही मी वाट पाहतेय'

यावेळी बब्बू भाई यांनी कसलाही विचार न करता, रक्षाबंधनाची भेट म्हणून संबंधित महिलेच्या मनगटावर नवंकोरं घड्याळ बांधलं. दरम्यान तेथून जाणाऱ्या व्यक्तीनं हा अनोखा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपला. त्यानंतर काही मिनिटांतच हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात व्हायरल झाला आहे. एका मुस्लीम व्यक्तीनं रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेला घड्याळ भेट दिल्यानं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

First published: