मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास शासकीय मदत नाही-संमेलप्रमुखांची खंत

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास शासकीय मदत नाही-संमेलप्रमुखांची खंत

कुठलीच शासकीय मदत मिळत नाही अशी खंत संमेलनप्रमुख इक्बाल शेख यांनी व्यक्त केली आहे. काल 11 व्या मुस्लिम साहित्य संमेलनात पनवेलमध्ये ते बोलत नाही.

  • Share this:

पनवेल, 04 नोव्हेंबर: मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास कुठलीच शासकीय मदत मिळत नाही अशी खंत संमेलनप्रमुख इक्बाल शेख यांनी व्यक्त केली आहे. काल 11 व्या मुस्लिम साहित्य संमेलनात पनवेलमध्ये ते बोलत नाही.

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आयोजित 11व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं काल पनवेलमध्ये उदघाटन झालं. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं.इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नाही. इस्लाम अन्यायाविरोधात लढणारा

धर्म आहे तरीही अनेकांमध्ये या धर्माविषयी अज्ञान असून इस्लामचा होणारा अपप्रचार या माध्यमातून खोडून टाकला पाहिजे. तसंच हिंदू मुस्लिम ऐक्याची संधी या संमेलनातुन लाभली असं ठाम मत जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी मांडलं.

मराठी मुस्लिम हे या मराठी संस्कृतीचे अभिन्य अंग आहेत. या संस्कृतीचे रक्षण करणे व त्याला वृद्धिंगत करणे हे या संमेलनाचे मुख्य उद्देश्य आहे. हे संमेलन हिंदु-मुस्लिम ऐक्याचं एक प्रतिक मानलं जातं.

त्यामुळे यापुढे तरी अशी मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 4, 2017, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading