अनोखी ईद, नमाज पठण होताच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुस्लीम बांधव सरसावले

अनोखी ईद, नमाज पठण होताच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुस्लीम बांधव सरसावले

पूरग्रस्तांसाठी मौलाना मोहम्मद रेहमतुल्ला यांनी नमाज पठण केल्याचंही पाहायला मिळालं.

  • Share this:

सुमित सोनवणे, दौंड, 12 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला आहे. बकरी ईदनिमित्त नमाज पठत केल्यानंतर मुस्लीम समाजाने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुराने कहर केला असताना मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. दौंडमध्ये आज ईदच्या निमित्ताने ईदगा मैदानावर नमाज पठणाच्या वेळी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली. यावेळी पूरग्रस्तांसाठी मौलाना मोहम्मद रेहमतुल्ला यांनी नमाज पठण केल्याचंही पाहायला मिळालं.

दरम्यान, कोल्हापुरात पूर आल्यानंतर महाराष्ट्रात माणुसकीचा महापूर आला आहे. समाजातील अनेक घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने यंदाच्या बकरी ईदला आर्थिक कुर्बानी करण्याचा निश्चय केला आहे.

कोल्हापुरात मुस्लीम समाजातील काही युवकांनी केलेलं आवाहन

"शेतकरीवर्गाचे हाल - हाल झालेले आहेत , मुक्या प्राण्यांची वाताहात झालेली आहे . लाखो लोक बेघर झालेले आहेत . उद्योग-व्यवसाय ठप्प झालेले आहेत. पूरग्रस्तांच्या अडचणी या पूर ओसरल्यानंतर अधिकच वाढणार आहेत. रोगराई बरोबर मुकाबला करावा लागेल. घरांची डागडुजी करावी लागेल. बेकारी व दारिद्र्य वाढीस लागेल. एकूणच सामान्य माणूस हा होरपळून निघत आहे. तर आज राजश्री शाहू महाराज यांच्या करवीर नगरीतील मुस्लीम समाजाने सर्वानुमते एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . आता येत असणारी " बकरी ईद " ला बकरीवर येणारा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. माझे सागंली जिल्हातील पूरग्रस्त भाग सोङून जे मुस्लीम बाधंव आहेत त्यांनी ही हा निर्णय घ्यावा आणि एका बोकडाचा जवळपास 20 हजार रुपयांचा खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला जावा. इस्लामचे मूलभूत तत्व हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. शासकीय मदत ही तटपुंजी असणार आहे. लोक निराधार आहेत. आज त्यांना आधाराची गरज आहे . तो आधार देण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. आपण मुस्लिम बांधव मदरसा इथं कुरबानीचा हिस्सा देवून आपली " कुर्बानी" ही करून ईश्वराचे आदेश पाळून आपली मूलभूत तत्वाचे पालन करून एखाद्याच्या अंधारमय जीवनात मिनमिनता का होईना प्रकाश पाङू शकता. उदाहरणार्थ एक बोकङ 20000 / रुपये त्यांचा एक हिस्सा हा 5000/ रुपये आपण देवून आपली " कुर्बानी " पार पाङू शकता. तसंच राहिलेले 15000 /रुपये आपण स्वतः आपल्या हाताने बाधित पूरग्रस्ताला शक्य ती मदत करून त्याचं जीवन सुसह्य करू शकता ....

पैगंबर मोहम्मद यांनी म्हटले आहे की आपल्या शेजारच्या घरात जर अन्न शिजत नसेल व तर आपले घरातील अन्न हे पहिल्यादा त्या घरात दिले पाहिजे...तो कोणत्याही धर्माचा वा जातीचा असू दे...तर चला आपण आपल्या बाधंवाची मदत करू! तरी या सूचनेची आपण गांभीर्याने दखल घेवून योग्य निर्णय घेतला जावा ही विनंती. मला जे योग्य वाटले ते मी नमूद केले आहे."

ग्राऊंड रिपोर्ट: पाणी ओसरल्यानंतर रस्त्यांवर चिखलामुळे दलदल, पाहा महापुराची दाहकता LIVE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 11:01 AM IST

ताज्या बातम्या