मूर्ती धरणाच्या भिंतीला भगदाड, जामनेर तालुक्यात भीतीचं वातावरण

धरणाच्या खाली असणार्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तातडीने कारवाई करत डागडुज्जी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 04:50 PM IST

मूर्ती धरणाच्या भिंतीला भगदाड, जामनेर तालुक्यात भीतीचं वातावरण

इम्जितियाज अहमद, 27 सप्टेंबर : जामनेर कांग प्रकल्पावर कांग नदीवर असलेल्या मूर्ती धरणाच्या भींतीला पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे भगदाड पडल्याने जामनेर तालुक्यात घबराट पसरलीय.  मूर्ती धरणाच्या सांडव्याची काँक्रिटची भिंत खचल्याने धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागला आहे. या घटनेनंतर जामनेर तहसीलदारांनी कांग नदीच्या काठावर असणार्‍या गोद्री, फत्तेपूर, टाकळी, निमखेडी, मेहेगांव, जळांद्री, सावरला, आमखेडा, ओझर सामरोद, टाकरखेडा, जामनेर, हिवरखेडा यांच्यासह अनेक गांवामध्ये दवंडी देवून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.  दरम्यान, या पाण्यामुळे धरणाच्या संरक्षण भिंतीचा भरावही वाहून जात आहे. धरण फुटल्यास सोयगाव तालुक्यासह जामनेर तालुक्यातील काही गावांना याचा धोका होण्याची शक्यता असल्याने घबराटीचे वातावरण आहे.

या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

पोकलेन आणि इतर मशिन्सच्या साह्याने पाण्याचा प्रवाह बदलविण्याचा प्रयत्न सुरू आहे व भिंतीचा वाहून गेलेला भराव भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. धरणाच्या खाली असणार्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तातडीने कारवाई करत डागडुज्जी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. या आधी कोकणात तिवरे धरणाची भिंत खचल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह आला होता. त्यात अनेक वाड्या आणि वस्त्यांचं नुकसान झालं होतं. अशा घटना घडलेल्या असताना खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घ्यायला पाहिजे अशी मागणीही गावकऱ्यांनी केलीय.

धक्कादायक: मुंबईत तरूणावरच गॅंगरेप.. पार्श्वभागात टाकली नारळाची कवटी

कोकणातल्या घटनेनंतर राज्यातल्या धरणांच्या भिंतीचं ऑडीट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तिवरे धरणाची भींत ही खेकड्यांमुळे खचली असं वक्तव्य शिवसेनेच्या एका मंत्र्यांनी केल्यामुळे वादही निर्माण झाला होता. त्यानंतर मोठं आंदोलनही झालं होतं. खेकडे भिंत फोडत असताना सरकार काय करत होतं असा सवाल विरोधकांनी विचारला होता. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेरीच्या तज्ज्ञांचा दाखला देत खेकडे धरणाची भिंत पोखरू शकतात असं सांगत शिवसेनेच्या मंत्र्यांचा बचाव केला होता.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...