औरंगाबाद, 8 डिसेंबर: औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असलेल्या पतीने पत्नीची हत्या केली आहे. औरंगाबादमधील वाळूजच्या संघर्षनगरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीचा पत्नीसोबत चात्रित्र्याच्या संशायावरून बुधवारी रात्री वाद झाला होता. रागाच्या भरात आरोपीने पत्नीवर लोखंडी सळईने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर थोड्याचवेळात तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसापूर्वी पैठणमध्येही चारित्र्यांच्या संशावरू अशीच घटना घडली होती. पतीने पत्नीची हत्या केली. गेल्या तीन दिवसांत चारित्र्याच्या संशयातून जिल्हात दोन महिलांचे बळी गेले आहेत.
डोक्यात लोखंडी सळईने वार
घटनेबाबत अधिक माहिती अशी की , आरोपी संतोष जाधव हा त्याची पत्नी लक्ष्मीबाई जाधव यांच्यासोबत वाळूज परिसरातील संघर्षनगरमध्ये राहात होता. चारित्र्याच्या संशायावरून त्याचे बुधवारी लक्ष्मीबाई जाधव यांच्यासोबत भांडणं झालं. भांडणाचा राग अनावर झाल्यानं त्याने आपली पत्नी लक्ष्मीबाई यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या, त्यानंतर त्यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष जाधव याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा : गुप्तधनासाठी 'त्या'ला जिवंत जाळलं; जादूटोण्याच्या प्रकारानं औरंगाबाद पुन्हा एकदा हादरलं
तीन दिवसातील दुसरी घटना
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याची ही गेल्या तीन दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी देखील अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये घडली होती. पतीने पत्नीची चारित्र्याच्या संशयातून हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad