भिवंडी, 8 जून : अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे भावावर पोस्कअंतर्गत गुन्हा दाखल आहे. पण हा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील गैबिनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मयत मोहम्मद अक्रम अकबर (वय 48) हे घरी जात असताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यास ईस्तेखार याने रस्त्यात अडवून त्याच्या भाऊ अख्तर सय्यद याच्याविरोधात पुतण्या शेहबाज याने पोस्को अंतर्गत गुन्ह्यातील तक्रार मागे घे, त्या गुन्ह्यामुळे माझ्या भावाला न्यायालयात जामीन होत नसल्याने धमकावले.
हेही वाचा -सुनेनं बॉयफ्रेंडसोबत मिळून सासरी केली 1.75 कोटींची चोरी, परदेशात जाणार होते पळून
मोहम्मद अक्रम अकबर याने, 'जे व्हायचे ते कोर्टात होईल' असे बोलले असता ईस्तेखार सय्यद याला या बाबत राग येऊन त्याने अबुशमा सय्यद उर्फ अम्मू , इस्माईल अन्सारी, इब्राहिम अन्सारी,इस्राईल अन्सारी ,वसीम उर्फ शेरू या आपल्या ओळखीतील मित्रांना जमा केले.
त्यानंतर अक्रम अकबर हे आपल्या घरी जात होते. तेव्हा त्यांच्यावर आरोपी आरोपी ईस्तेखार याने आपल्या साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. अक्रम अकबर यांच्या दोन्ही पायावर, डाव्या हातावर लोखंडी रॉडने वार करून फ्रॅक्चर केले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत अकबर यांना रस्त्यावर सोडून घटनास्थळावरून पोबारा केला.
हेही वाचा -बऱ्याच दिवसांनी दिलासादायक बातमी, 'या' दिवशी महाराष्ट्रात मान्सून होणार दाखल
जखमी मोहम्मद अक्रम अकबर अली अन्सारी यांना उपचाराकरीता दाखल करण्यात आले. त्याचवेळी त्याच्या तक्रारी वरून मारहाणीचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. परंतु, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जखमी अक्रम अकबर अली अन्सारी यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्यातील सहा आरोपींना काही तासात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.