मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून; राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून; राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

fighting between NCP and BJP worker- या मारहाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

Murder of Gram Panchayat member in Sangali : सांगली, 4 मार्च : सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावात उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजप खासदार संजय पाटील यांच्या बोरगावातील कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Murder of Gram Panchayat member over dispute over sub panch in Sangali)

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या हाणामारीत एका ग्रामपंचायत सदस्यची हत्या झाली आहे. पांडुरंग काळे असे मृत  सदस्याचे नाव आहे. तर या मारहाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 4 ते 5 जणं जखमी झाले आहेत.

जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा-दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद, भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिली मोठी जबाबदारी

भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे. पांडुरंग काळे यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला या उपसरपंच निवडीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपल्या गटातून चार सदस्य फुटले आणि राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार या रागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि ज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणानंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: BJP, NCP, Sangali