नागपूर, 4 जून: कोरोना व्हायरसमुळे नुकताच पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंडाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीने ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनू ठाकूर ( रा.यशोधरा नगर) असं हत्या झालेल्या गुंडांच नाव आहे. ही थरारक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास फुकटनगर परिसरात घडली.
अनू ठाकूर हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अनू ठाकूर हा फुकटनगर चौकात फिरायला आला होता. तेथे आरोपी सोनू, उस्मान अली, मख्खन हे सापळा रचून बसले होते. दगड, विटा आणि धारदार शस्त्रांनी अनू ठाकूरवर मारेकऱ्यांनी वार केले.
हेही वाचा -VIDEO : हत्तीच्या पिल्लानं दाखवली माणूसकी, बुडणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव
अनू ठाकूर यांचा जागेवरच मृत्यू झाला. काही दिवसाअगोदर अनू ठाकूर याने आरोपीची गाडी जाळली होती. त्यामुळे आरोपी जळलेल्या गाडीची भरपाई मागत होता. यातच काल दोघांचाही आमनासामना झाला यावेळी दोघांमध्ये वादविवाद झाला. यातून अनू ठाकूरची हत्या करण्यात आली असल्याचे यशोधारानगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक साखरे यांनी माहिती दिली आहे.
पोलिसांसमोरच एकमेकांनी केलो कोयत्याने वार
दरम्यान, साताऱ्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस स्टेशन समोरच धारदार कोयत्याने एकमेकांवर वार केल्याची थरारक घटना घडली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
सातारा तालुका पोलिस स्टेशनसमोर गुरूवारी सकाळी 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली. दोघांमध्ये जुना वाद असल्याने ते पोलिस ठाण्यात आल्यानंतर हा राडा झाला. साताऱ्यातील सैदापूर येथे राहणाऱ्या सुरेश दुबळे आणि रामा दुबळे यांच्यात गावी वाद झाला होता. ते गुरुवारी सकाळी पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सुरेश दुबळे याने आणलेल्या कोयत्याने रामा दुबळे याच्यावर पहिला वार केला.
हेही वाचा -त्या आईसाठी जवान झाला 'कॅप्टन रेल्वे' चालत्या ट्रेनमध्ये पोहोचवलं दुधाचं पॅकेट
सुरेशने अचानक केलेल्या हल्लामुळे एकच गोंधळ उडाला. दोघांमध्ये झटापट झाली आणि रामाने सुरेशच्या हातातून कोयत्या हिसकावून घेतला आणि त्याच धारधार रामाने सुरेश याच्यावर वार केला.
दरम्यान, थेट पोलिस स्टेशन हल्ला झाल्याने पोलिसांची धावाधाव उडाली. दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांनाही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना समजताच सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.