प्रेम प्रकरणातून नागपुरात भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या, डोक्यात घातला लोखंडी रॉड

प्रेम प्रकरणातून नागपुरात भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या, डोक्यात घातला लोखंडी रॉड

शहरातील प्रताप नगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोपाल नगरमध्ये भर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

नागपूर, 4 जून: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 24 तासांतील हत्येच्या दोन घटनांमुळे नागपूर शहर हादरलं आहे.

शहरातील प्रताप नगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोपाल नगरमध्ये भर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. युवक दुचाकीवरून जात होता. त्याच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन मारेकऱ्यांनी लोखंडी रॉडने तरुणाच्या डोक्यावर हल्ला केला.

हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी येणार सुपर हायटेक विमान, 1400 कोटी केले खर्च!

तरुण जमिनीवर कोसळला. रस्त्यावरील नागरिकांनी त्याला तातडीनं गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

कुख्यात गुंडांची हत्या

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे नुकताच पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंडाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीने ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनू ठाकूर ( रा.यशोधरा नगर) असं हत्या झालेल्या गुंडांच नाव आहे.  ही थरारक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास फुकटनगर परिसरात घडली.

हेही वाचा -Lockdownमुळे स्वप्न भंगलं, सिंगापूरमध्ये असलेला शेफ आता चारतोय बकऱ्या!

अनू ठाकूर हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अनू ठाकूर हा फुकटनगर चौकात फिरायला आला होता. तेथे आरोपी सोनू, उस्मान अली, मख्खन हे सापळा रचून बसले होते. दगड, विटा आणि धारदार शस्त्रांनी अनू ठाकूरवर मारेकऱ्यांनी वार केले. अनू ठाकूर यांचा जागेवरच मृत्यू झाला. काही दिवसाअगोदर अनू ठाकूर याने आरोपीची गाडी जाळली होती. त्यामुळे आरोपी जळलेल्या गाडीची भरपाई मागत होता. यातच काल दोघांचाही आमनासामना झाला यावेळी दोघांमध्ये वादविवाद झाला. यातून अनू ठाकूरची हत्या करण्यात आली असल्याचे यशोधारानगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक साखरे यांनी माहिती दिली आहे.

First published: June 4, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या