Home /News /maharashtra /

कल्याणमधील हाय प्रोफाईल परिसरात दगडाने ठेचून महिलेची हत्या

कल्याणमधील हाय प्रोफाईल परिसरात दगडाने ठेचून महिलेची हत्या

आज सकाळच्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत पडला होता.

आज सकाळच्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत पडला होता.

कल्याण गांधारी परिसरात रिंग रोडचे काम सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत पडला होता.

कल्याण, 06 ऑगस्ट : कल्याणच्या  हाय प्रोफाईल गांधारी ( Gandhi  kalyan) परिसरात एका महिलेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. भर रस्त्यात या महिलेचा मृतदेह (woman dead body) आढळला आहे. ही हत्या महिलेच्या पतीने केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. सध्या खडकपाडा पोलीस या हत्येचा तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण गांधारी परिसरात रिंग रोडचे काम सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत पडला होता. Covishield चा दुसरा डोस 4 आठवड्यात घेण्याची परवानगी द्या; कोर्टाचा आदेश याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. खडकपाडा पोलीस  पथकासोबत घटनास्थळी धाव घेऊन  मृतदेह ताब्यात घेतला. मयत महिलेचं नाव लक्ष्मी मोहिते असं आहे. ती त्याच परिसरात घर काम करणारी आहे. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. लक्ष्मीची हत्या झाल्यानंतर सध्या तो बेपत्ता आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. या महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाला दरम्यान,  चंद्रपूर जिल्ह्यातील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनी सापडला आहे. या महिलेनं शनिवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास वर्धा नदीच्या पुलावरून उडी मारल्याची माहिती स्तहनिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार या महिलेचा शोध घेण्यात येत होता. त्यानुसार या महिलेचा मृतदेह सापडला आहे. सफाई कर्मचारी बनला 'सुपरहिरो', चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून खेचलं; थरारक VIDEO घुग्गुस- वणी या मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पुलावरून एका महिलेनं नदीत उडी घेतल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे या महिलेचा युद्धस्तरावर शोध घेण्यात येत होता. सोमवारी पुन्हा बचाव पथकाकडून आणि पोलिसांकडून महिलेला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता दुपारच्या सुमारास या महिलेचा मृतदेह नदीच्या घाटाजवळ आढळून आला. सौ. रविता जुनघरी असं या महिलेचं नाव आहे अशी माहिती मिळाली आहे. या महिलेच्या आत्महत्येचं कारण अजूनही स्प्ष्ट नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास कारण्यात येत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Kalyan

पुढील बातम्या