Home /News /maharashtra /

स्ट्रॉबेरी विक्रेत्याची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

स्ट्रॉबेरी विक्रेत्याची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

दोघेही हल्लेखोर खून करून फरार झाले असून निजामपूर पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

भिवंडी, 23 जानेवारी : स्ट्रॉबेरी विक्रेत्याची हत्या झाल्याची घटना भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निजामुद्दीन हजरतदीन राईन ( वय 35 ) असं हत्या झालेल्या स्ट्रॉबेरी विक्रेत्याचं नाव आहे. अंसार उर्फ पप्पू मोहरम अली राईन (वय 35, रा, भिवंडी) सद्दाम हुसैन अनवरअली राईन (रा. बाळा कंपाउंड ) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहे. दरम्यान हे दोघेही हल्लेखोर खून करून फरार झाले असून निजामपूर पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. श्रीदेवी ज्वेलर्सच्या दुकानाशेजारी असलेल्या गाळ्यात ही हत्या करण्यात आली. मयत निजामुद्दीने याने आरोपींकडून घाऊक दरात उसनवारी करत स्ट्रॉबेरीची खरेदी केली होती. त्यानंतर निजामुद्दीने या स्ट्रॉबेरीची विक्री केली. मात्र आरोपींचे पैसे परत केले नाहीत. या कारणातूनच दोन्ही आरोपींनी मिळून निजामुद्दीनची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती आहे. नेमकं काय घडलं? शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी ज्वेलर्स या दुकानाच्या शेजारी असलेल्या रिझवान शेठ यांच्या गाळात निजामुद्दीन हा फळांची विक्री करत होता. त्याचवेळी आरोपी अंसार आणि सद्दाम हुसैन हे उसने घेतलेले पैसे नेण्यासाठी तिथे आले. मात्र पैशांची चणचण असल्याने निजामुद्दीने याने ते पैसे परत करण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी निजामुद्दीन याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात निजामुद्दीन याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात मोहम्मद ताज छोट्टन राईन याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा हल्लेखोराविरोधात विविध कलमानुसार हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एन.एम.घोळकर करीत आहेत. 
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Bhiwandi, Crime news

पुढील बातम्या