प्रेयसीसोबत मित्र बसला म्हणून केला मित्राचाच खून

प्रेयसीसोबत मित्र बसला म्हणून केला मित्राचाच खून

धक्कादायक बाब म्हणजे घटनेत मृत पावलेला तरुण हा एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने एकच खळबळ उडाली आहे

  • Share this:

चिंचवड,12 सप्टेंबर: आपल्या प्रेयसीसोबत मित्र बसल्याच्या रागातून काही तरुणांनी मिळून त्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीआहे.धक्कादायक बाब म्हणजे घटनेत मृत पावलेला तरुण हा एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने एकच खळबळ माजली आहे.

आदित्य सुनील जैद असं मयत मुलाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा आरोपीच्या मैत्रिणीसोबत बसला होता, ते कळताच आरोपींनी त्याला महाविद्यालया जवळून जीपमध्ये बसवलं. त्यानंतर एका ठिकाणी नेऊन त्याला बॅटने बेदम मारहाण केली.

या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाल्याने त्याला भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी दाखल केले. मात्र त्याआधीच आदित्यचा मृत्यु झाला होता हे लक्षात येताच आदित्यचा मृतदेह दवाखान्यातच सोडून सर्व आरोपी पळून गेले आणि हे प्रकरण उघडकीस आलं.

 

First Published: Sep 12, 2017 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading