भिवंडी, 3 नोव्हेंबर : एकीकडे दिवाळीची (diwali) सर्वत्र धामधूम सुरू असताना भिवंडीत (bhiwandi) धक्कादायक घटना घडली आहे. पेपर गोदामात कामाच्या वादातून एका तरुणाची सहकारी कामगाराने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या (murder) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात ही घटना घडली आहे. राजू क्यातम (वय 18) असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव आहे. मोहम्मद असिफ अन्सारी (वय 21) असे हत्या करून फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पेपर गोदामात कामाच्या वादातून राजू क्यातमची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली.
Team India मध्ये द्रविड पर्व! कोच झाल्यानंतर The Wall ची पहिली प्रतिक्रिया
मयत राजू व आरोपी मोहम्मद अन्सारी हे दोघे लेमिनेशन पेपरच्या गोदामात काम करीत होते. दोघेही चांगले काम करत होते. पण, दोघांमध्ये चांगलं काम कोण करत या कारणावरून वाद झाला होता. यातून महिन्यापूर्वी भांडण झाले होते.
पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या, पुणे हादरलं
या भांडणाचा राग धरून मोहम्मद अन्सारीने राजूची कटरने वार करून गळा चिरून हत्या केली. राजूची हत्या केल्यानंतर अन्सारी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर स्थानिक नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती उशीरा पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi