Home /News /maharashtra /

सोन्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याला संपवले, 48 तासात अकोला पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडले

सोन्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याला संपवले, 48 तासात अकोला पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडले

चांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 11 जानेवारी रोजी एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.

अकोला, 16 जानेवारी : अकोला जिल्ह्यातील चांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावरगाव ते डोनगाव रोडवरील जंगलात अज्ञात व्यक्तीचा मुतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता वेगळे वळण आले असून सदर इसमाची हत्या केल्याचे समोर आले आहे. कोणताच सुगावा नसतांना अकोला स्थानिक गुन्हे शाखा तसंच चांनी पोलिसांनी यामधील आरोपीला अवघ्या 48 तासात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 11 जानेवारी रोजी एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यानंतर महिती मिळताच चांनी पोलीस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक इसम नेमका कोण व कुठला आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. (कोण आहे पाकिस्तानी दहशतवादी शास्त्रज्ञ अरिफा सिद्दीकी?) याचा शोध घेण्यास सुरुवात करीत असताना सदर इसम हा बुलडाणा जिल्ह्यात येत असलेल्या मेहेकर तालुक्यातील शेंदळा येथील सदाशिव तुळशीराम पवार असल्याचे निष्पन्न झाले. शेतात पिकाची पाहणी करण्यास गेलेले सदाशिव पवार हे घरी परतले नसल्याने या विरोधात डोंनगाव पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याचा गुन्हा नोंदवला होता. (‘मुलगी झाली हो’ मालिकेतील काहींनी किरण मानेंवर केले गंभीर आरोप तर...) पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सदर इसमाची हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याद्वारे तपास करण्यास सुरुवात केली. पोलीस सदर प्रकरणाचा तपास करीत असता तपासतात तीन व्यक्ती शेतात सदाशिव पवार यांना भेटण्यास आल्याचे सदाशिव पवार यांच्या मुलीने पोलिसांना सांगितलं होते. याच माहितीच्या आधारावर अकोला स्थानिक गुन्हे शाखा तसंच चांनी पोलीस यांनी सदर प्रकारात पोलिसांनी कुठलाच सुगावा नसताना सदर प्रकणाचा तपास करून या मधील दोन आरोपींना अटक केली असून यातील एक आरोपी हा अल्यवयीन आहे तर अद्यापपर्यंत एका आरोपीचा पोलीस शोध घेत असून असून सदर हत्या ही सोन्याच्या आमिषाने झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षका मोनिका राऊत यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Akola, Akola News, अकोला

पुढील बातम्या