मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सातारा हादरलं! अंडी उधार न दिल्याच्या रागातूनच दुकानदाराची निर्घृण हत्या

सातारा हादरलं! अंडी उधार न दिल्याच्या रागातूनच दुकानदाराची निर्घृण हत्या

अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं आहे.

अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं आहे.

अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं आहे.

सातारा, 19 डिसेंबर: अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं आहे. साताऱ्यातील बोगदा परिसरात ही घटना घडली आहे. दुकानदारावर दगड आणि आणि धारदार शस्त्रानं सपासप वार करण्यात आले आहेत. बबन हणमंत गोखले (वय-42) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

याप्रकरणी शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे. शुभम कदम, सचिन माळवे अशी आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा...धक्कादायक! कराडमध्ये तीन सख्ख्या बहिणीचा मृत्यू, आईनं फोडला हंबरडा

मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील यवतेश्वर पॉवर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले यांचं दुकान आहे. संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे हे दोखे शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्या दुकानात गेले होते. त्यांना दुकानदार बबन गोखले यांना अंडी उधार मागितली. मात्र, बबन यांनी अंडी उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. शुभम आणि सचिन याला याचा राग आला.

बबन यांनी अंडी दिल्याचा नकार दिल्यानं हे दोघेही संतापले. त्यांनी रागाच्या भरात बबन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी बबन गोखलेंबर दगड आणि धारदार शस्त्रानं सपासप वार केले. यामध्ये बबन यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण सातारा शहर हादरलं आहे.

हेही वाचा..भाजपला धक्का! पंढरपूरचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, शरद पवारांसोबत गाडीतून केला प्रवास

याप्रकरणी शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी शुभम कदम, सचिन माळवे या दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी फक्त अंडी उधार न देण्याच्या रागातून ही हत्या केली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Murder, Satara, Satara (City/Town/Village)