मुंबईत भरदिवसा एकाची गोळ्या घालून हत्या, घटनास्थळावरून पिस्तूल जप्त

मुंबईत भरदिवसा एकाची गोळ्या घालून हत्या, घटनास्थळावरून पिस्तूल जप्त

मुंबईतल्या साकी नाका परिसरात असलेल्या नहार सोसायटीत एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे- मुंबईतल्या साकी नाका परिसरात असलेल्या नहार सोसायटीत भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेला व्यक्ती आणि मारेकरी हे एकमेकांचे नातेवाईक    असल्याची माहिती मिळाली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इम्तिहान अब्दुल हसन खान असे  मृत व्यक्तीचे नाव आहे.

इमामुद्दीन शुरूला खान (वय-60, रा. खैराणी रोड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने साकीनाका पोलिसात स्वतःला स्वाधीन केले आहे. घटनास्थळी वरिष्ठ  पोलीस अधिकारी  पोहोचले आहेत.  पोलिसांनी

घटनास्थळावरुन पिस्तूल जप्त केले आहे. यासंदर्भात पोलीस तपास करीत असल्याची माहिती एसीपी मिलिंद खेतले यांनी दिली आहे. मृत इम्तिहान अब्दुल हसन खान यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

VIDEO:महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 02:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading