बायकोचे अनैतिक संबंध..प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा नव-याने असा काढला काटा

बायकोचे अनैतिक संबंध..प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराचा नव-याने असा काढला काटा

अशोक बिरादार हा पिंपरीत मागील काही महिन्यांपासून रहात होता. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची ओळख लक्ष्मण खुटेकर याच्या पत्नीशी झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते.

  • Share this:

पुणे,17 एप्रिल- पिंपरीत एका तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन त्याची निर्घृण हत्या झाली आहे. ढोरेनगर, सांगवी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अशोक लक्ष्मण बिरादार (32,रा. सुसगाव, मूळ-कर्नाटक) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण खुटेकर (30, रा.ढोरेनगर, सांगवी) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे हे प्रकरण?

अशोक बिरादार हा पिंपरीत मागील काही महिन्यांपासून रहात होता. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची ओळख लक्ष्मण खुटेकर याच्या पत्नीशी झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. अशोक हा लक्ष्मणच्या गैरहजेरीत कायम त्याच्या घरी येत जात होता. लक्ष्मण याच्या हा प्रकार लक्षात आला होता. पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याने लक्ष्मण पेटून उठला होता.

अशोक हा मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे प्रेयसीला (लक्ष्मणच्या पत्नीला) भेटायला आला होता. यावेळी लक्ष्मण हा देखील घरीच होता. अशोक आल्याचे पाहून लक्ष्मणची तळपायातील आग मस्तकात गेली. लक्ष्मणने अशोकच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. सांगवी पोलिसांनी लक्ष्मणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

VIDEO: प्रेमीयुगुलाला अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 02:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading