जालन्यात किल्ला जिनिंग परिसरात तरुणाची हत्या; भाजप नेत्याला अटक

जालन्यात किल्ला जिनिंग परिसरात तरुणाची हत्या; भाजप नेत्याला अटक

जालन्यात काळुंका देवीच्या मंदिरात एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. कुमार जुंझूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

  • Share this:

जालना, 25 एप्रिल-  जालन्यात किल्ला जिनिंग परिसरात काळुंका देवीच्या मंदिराजवळ एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. कुमार जुंझूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या हत्येप्रकरणी भाजपच्या ओबीसी मोर्चाचा शहर उपाध्यक्ष विजय मुंगसे याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, जालन्यातील किल्ला जिनिंग परिसरात गुरुवारी ही घटना समोर आली. कुमार जुंझूर हा शहरातील लक्ष्मीनारायण पुरा भागात राहत होता. तरुणाच्या शरीरावर चाकूने वार केले आहेत. कदीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही हत्या रात्री झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पैशासाठी निर्घृण खून

कुमार जुंझूर याची हत्या पैशासाठी केल्याचे उघड झाले आहे. आरोपी विजय मुंगसे याने या हत्येची कबुली दिली आहे. आरोपीने कुमार जुंझूरकडे ठेवण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये दिले होते. मात्र, तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता. या कारणाने आपण त्याची हत्या केल्याची कबुली विजय मुंगसे याने दिली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

First published: April 25, 2019, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading