हळदीचा कार्यक्रम होताच चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, भिवंडीतील घटना

हळदीचा कार्यक्रम होताच चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, भिवंडीतील घटना

हळदीच्या समारंभात काका-पुतण्यात बाचाबाची झाली. घरी परतत असणाऱ्या पुतण्याला काका आणि त्याच्या मुलांनी रस्त्यात अडवून त्याची हत्या केली. चिंतामण उर्फ चाहू विठ्ठल जाधव (पाटील) (वय-45) असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

  • Share this:

रवी शिंदे (प्रतिनिधी),

भिवंडी, 11 मे- तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधनी या गावात जमिनीच्या वादातून चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली आहे. गावात हळदीच्या समारंभात काका-पुतण्यात बाचाबाची झाली. घरी परतत असणाऱ्या पुतण्याला काका आणि त्याच्या मुलांनी रस्त्यात अडवून त्याची हत्या केली. चिंतामण उर्फ चाहू विठ्ठल जाधव (पाटील) (वय-45) असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चुलत काका व दोघा चुलत भावानी कुऱ्हाडीने डोक्यात वार करुन हत्या केली. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात येत असून पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे हे प्रकरण?

भिवंडी तालुक्यातील पडघा जवळच्या पाच्छापूर नजीकच्या दुधनी या गावात चिंतामण जाधव (पाटील ) यांचे त्यांचे चुलत काका अनंत लिंबा जाधव व त्यांचे मुलगे अरुण व प्रकाश यांसोबत कौटुंबिक जमिनीचा वाद होता. त्यावरून मागील काही दिवस त्यांच्यात भांडणे सुध्दा झाली होती. 10 मे रोजी रात्री चिंतामण जाधव यांच्या गावात एका लग्नसमारंभात हळदीचा कार्यक्रम सुरु होता. त्याठिकाणी चिंतामण जाधव गेले असता त्याठिकाणी त्यांच्या घरा शेजारी राहणारे चुलत काका अनंत लिंबा जाधव व चुलत भाऊ अरुण जाधव व प्रकाश जाधव यांच्यात वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर चिंतामण जाधव हे मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना त्यांना रस्त्यातून फरफटत खेचत आपल्या घराकडे घेऊन जात त्याठिकाणी कुऱ्हाडीने चिंतामण जाधव यांच्या डोक्यात वार केले. चिंतामण हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असता त्याला घराबाहेर टाकून तिघांनी घरात घुसून आतून दरवाजा बंद केला.

या हाणामारीचा गदारोळ सुरू होता त्यावेळी घराबाहेर असलेल्या चिंतामणीचा मुलगा नितीन याने पहिले. आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले पाहून त्याने कुटुंबियांना बोलावले. चिंतामणी यांना अंबाडी येथे उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती पडघा पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार हत्येचा गुन्हा नोंदविण्यात येत असून तिघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ

First published: May 11, 2019, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading