भिवंडीत एकाची निर्घृण हत्या, तीक्ष्ण हत्याराने केले वार

भिवंडीत एकाची निर्घृण हत्या, तीक्ष्ण हत्याराने केले वार

वाडा रोडवरील अंबाडी येथील अंबाडी वाईन शॉपच्या मागे तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

भिवंडी, 21 जून- वाडा रोडवरील अंबाडी येथील अंबाडी वाईन शॉपच्या मागे तीक्ष्ण हत्याराने वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बळीराम जाधव (रा.दलोंडे) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. गणेशपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची भिवंडीत निर्घृण हत्या

दुसऱ्या घटनेत अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तरूणाला तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय पीडित महिला भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका चाळीत राहात होती. ती घरात एकटी असताना संधी साधून आरोपी निखील संजय कडू ( वय-20) या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने अत्याचाराला प्रतिकार केला असता त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या 10 तासांत निखील कडू आरोपीला अटक केली आहे.

व्याजाच्या पैशातून तरुणांवर कोयत्याने वर करून केली निर्घृण हत्या

व्याजाच्या पैशातून तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अहमदनगर शहरात मनमाड मार्गावरील पद्मावती पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. योगेश इथापे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोराने त्याच्यावर कोयत्याने वर केले होते. त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, योगेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुसरीकडे, आरोपी कृष्णा गायकवाड याने स्वत:हून तोपखना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कृष्ण गायकवाड यांच्याकडून योगेश इथापे याने व्याजाने पैसे घेतले होते. अनेकदा मागूनही त्याने ते परत दिले नाही. या रागातून कृष्णा गायकवाडने त्याच्यावर कोयत्याने वर केले. आरोपीविरूद्ध तोपखना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची भिवंडीत निर्घृण हत्या

अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तरूणाला तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 23 वर्षीय पीडित महिला भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका चाळीत राहात होती. ती घरात एकटी असताना संधी साधून आरोपी निखील संजय कडू ( वय-20) या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने अत्याचाराला प्रतिकार केला असता त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या 10 तासांत निखील कडू आरोपीला अटक केली आहे.

VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 04:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading