बदनापूर तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून, डोक्यात धारदार शस्त्राने केले वार

बदनापूर तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून, डोक्यात धारदार शस्त्राने केले वार

बदनापूर तालुक्यातील रामखेडा गावात घरात झोपलेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष कुरधने (22) असे या मयत युवकाचे नाव आहे. मारेकऱ्याने संतोषच्या डोक्यात धारदार शस्त्राचे वार केले आहेत.

  • Share this:

जालना, 15 मे- बदनापूर तालुक्यातील रामखेडा गावात घरात झोपलेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष कुरधने (22) असे या मयत युवकाचे नाव आहे. मारेकऱ्याने संतोषच्या डोक्यात धारदार शस्त्राचे वार केले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब गेल्या 10 वर्षांपासून रामखेडा येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहे. संतोषचे आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान याचवेळी स्वतःच्या घरात एकट्याच झोपलेल्या संतोष कुरधनेचा डोक्यात वार करून त्याचा खून करण्यात आला. बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

खरपुडी शिवारात रानटी कुत्र्यांचा धुमाकूळ..

दुसरीकडे, खरपुडी शिवारात रानटी कुत्र्यांनी धुमाकूळ केला आहे. बुधवारी पहाटे 4 वाजता शरद रामकीसन शेजुळ या शेतकऱ्याच्या 5 बकऱ्या कुत्र्यांनी ठार मारल्या. आठ दिवसांपासून कुत्रे धुमाकुळ घालत आहेत. यापूर्वी शरद शेजुळ यांच्या 2 शेळ्या मारल्या होत्या. या घटनेमुळे शेजुळ यांचे अंदाजे 60 हजारांचे नुकसान झाले आहे.

रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत गावात 50 जनावरं मारल गेली आहेत. त्यात गायीचा समावेश आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. शरद शेजुळ यांनी काही दिवसांपूर्वीच कर्ज घेऊन शेळ्यांचा व्यवसाय सुरू केला होता.

VIDEO: कोण खरं काय खोटं? भाजप-तृणमूलकडून व्हिडीओ ट्वीट

First published: May 15, 2019, 4:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading