सिध्दार्थ गोदाम (प्रतिनिधी),
औरंगाबाद,11 मे- भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन वाद होऊन चुलत भावानेच चुलत भावाची चाकू भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना शहरातील ऋषीकेशनगर भागात घडली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला. आरोपीला शनिवारी सकाळी नवी मुंबईतील वाशीमधून अटक करण्यात आली आहे.
भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात सख्या चुलत भावांचा नाचण्यावरून वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्याने एकाने दुसऱ्याच्या छातीत चाकू खुपसला. 20 वर्षीय तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी साडे दहाच्या सुमारास
चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे घडली. आकाश शेळके असे मृताचे नाव आहे. तर घटनेनंतर आरोपी पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सचिन शेळके आणि त्याचा चुलत भाऊ आकाश शेळके यांच्यात वाद होता. आकाश सेन्ट्रीग काम करतो तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात शिकत आहे. या दोघांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे सुरू होता. त्यात दोघांचा नाचण्यावरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्याने सचिन शेळके ने आकाशच्या छातीत चाकू खुपसला. जखमी आकाशला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली.
राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल