देहुत पोलीस चौकीसमोरच तरूणाची निर्घृण हत्या, धारदार शस्त्राने केले वार

देहुत पोलीस चौकीसमोरच तरूणाची निर्घृण हत्या, धारदार शस्त्राने केले वार

पोलीस चौकीसमोर एका तरूणाची 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

अनिस शेख (प्रतिनिधी)

देहु, 5 जुलै- पोलीस चौकीसमोर एका तरूणाची 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय-38) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करुन शंकरच हत्या केली.

मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी देहुचा आठवडे बाजार होता. त्यामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात गर्दी होती. पोलीस चौकीसमोरच ही हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत शंकर हा मागील दोन दिवसांपूर्वीच कारागृहातून सूटला होता. एका खुनाच्या प्रकरणात तो तुरुंगात गेला होता. पूर्ववैमनस्यातून शंकरची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज देहुरोड पोलिसांनी वर्तवला आहे.

कल्याणमध्ये दिवसाढवळ्या तरुणीची हत्या

कल्याणमध्ये दिवसाढवळ्या तरुणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी करण कर्णिक याला अटक केली आहे.

मुलींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने चोरल्या एक डझन बाईक..

नालासोपारा पोलिसांनी एका बाईक चोराच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. अमन आरिफ शेख (वय-19) असे बाईक चोराचे नाव आहे. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी अमन बाईक चोरत होता. असे करत करत त्याचे तब्बल एक डझन बाईक चोरल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून डझनभर बाईक जप्त केल्या आहेत.

आरोपी अमनला बाईक रायडिंगचा छंद होता. तो वयाच्या 16 वर्षापासून चोरी करत आहे. सुरवातीला तो पेट्रोल चोरी करत होता. आपल्याला कोणी पकडू शकत नाही, असा त्याचा समज झाला होता. मग तो बाईक चोरी करायला लागला. बाईक चोरी करून मनोर येथील संदीप वसंत रसाळ याला तो विकून मौजमजा करायचा. मात्र त्याची ही मजा फार काळ टिकू शकली नाही. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यांना बेड्या ठोकून कोठडीत टाकले. पोलिसांनी अर्नाळा येथून 7 ,नालासोपाऱ्यातून 4 आणि विरारमधून 1 अशा एक डझन बाईक जप्त केल्या आहेत.

शिवसेना नगरसेवकाची चिकन विक्रेत्याला बेदम मारहाण, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: July 5, 2019, 9:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading