अकोटच्या हत्याकांडात काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलांचे नाव, गुन्हा दाखल

अकोटच्या हत्याकांडात काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलांचे नाव, गुन्हा दाखल

अकोट तालुक्यातील मोहाळा येथील हत्याकांडामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचे नाव आले आहे. हे हत्याकांड लहान मुलांच्या भांडणावरून झाल्याचे कारण समोर आले आहे.

  • Share this:

अकोला, 25 मे- अकोट तालुक्यातील मोहाळा येथील हत्याकांडामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचे नाव आले आहे. हे हत्याकांड लहान मुलांच्या भांडणावरून झाल्याचे कारण समोर आले आहे. मात्र, याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मृतक मतीन पटेल हे भाजप अल्पसंख्याक सेलचे धडाडीचे कार्यकर्ते होते. या हत्याकांडात आणखी 10 जणांचा समावेश आहे.

काय आहे हे प्रकरण?

अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मोहाळा येथे शुक्रवारी सायंकाळी भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीनखाँ शेरखाँ पटेल (48) यांच्यासोबत गावातीलच काँग्रेस पक्षाशी संबंधित पटेल गटाच्या लोकांचा वाद झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा संदर्भ या घटनेच्या मागे असल्याचे बोलले जात आहे. या हल्लात मतीन पटेल यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत मुमताज पटेल मियाँ खाँ पटेल (55) हा गंभीर जखमी झाल्याने अकोला येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी उशिरा रात्रीपर्यंत या घटनेमागील सत्यकारण उलगडण्याचा प्रयत्न केला या घटनेतील फिर्यादी मुमताज खाँ याने पोलिसांना दिलेल्या जबाबात या घटनेमागे लहान मुलांच्या भांडणाचे कारण असून या कारणावरून हिदायत पटेलसह दहा जणांनी वादविवाद करून शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले. या तक्रारीवरून आरोपी हिदायत उल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल, इम्रानउल्ला खाँ पटेल, शफीकउल्लाखाँ पटेल, फारुकउल्लाखाँ पटेल, शोएबउल्लाखाँ पटेल, फरीदउल्लाखाँ पटेल, रहेमतउल्लाखाँ पटेल, रफतउल्लाखाँ पटेल, इस्ताकउल्लाखाँ पटेल, अतहरउल्लाखाँ पटेल यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाळा गावात घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर पोहचून गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या मोहाळा गावात शांतता असून पोलीस ताफा तैनात आहे.

VIDEO:महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 01:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading