अमानुष! 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नंतर 7 वर्षांच्या भावासह विहिरीत फेकलं

अमानुष! 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नंतर 7 वर्षांच्या भावासह विहिरीत फेकलं

खालिद या माथेफिरूने स्वत: येऊन भाऊ-बहिणीला विहिरीत फेकल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

  • Share this:

जळगाव, 11 जानेवारी : चोपडा तालुक्यातील धानोरा इथं एका माथेफिरूने दोघा भाऊ-बहिणीला विहिरीत फेकल्याची घटना घडली आहे. हे कृत्य केलेल्या माथेफिरूने स्वत: पोलीस स्थानक गाठत याबाबत माहिती दिली आहे. तसंच दोघांनाही विहिरीत फेकण्याआधी मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक कबुलीही आरोपी खालिद शेख इस्माईल याने दिली आहे.

खालिद या माथेफिरूने स्वत: येऊन भाऊ-बहिणीला विहिरीत फेकल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. जवळपासच्या अनेक विहिरींचा शोध घेऊनही बालके सापडली नाहीत. त्यानंतर रात्री विहिरीतून पाणी उपसा करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी 140 फूट खोल विहिरीत उतरून तळ गाठले. मात्र, त्यात अजूनही दोघांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी चिमुकल्यांचा परिसरातील शेतांमध्येही शोध घेण्यास सुरूवात केली आहे. अजूनही या भाऊ-बहिणीचा शोध सुरू आहे.

विहिरींमध्ये पोलिसांकडून शोध सुरू

दरम्यान, 'आरोपी खालिद हा गेल्या दोन वर्षांपासून तणावातच होता. तो परिसरातील लहान मुलांना त्रास देत होता. तो विनाकारण मुलांना चिडवायचा. अशा घटना वारंवार घडल्या आहेत,' अशी माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली आहे. आरोपी खालिदचे दोन लग्न झाली असून त्याच्या पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत.

Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून आखला पतीच्या खुनाचा कट

First published: January 11, 2019, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading