• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बापानंच केलं पोटच्या मुलीला विधवा, प्रेमविवाह केल्याच्या रागातून केला जावयाचा खून

बापानंच केलं पोटच्या मुलीला विधवा, प्रेमविवाह केल्याच्या रागातून केला जावयाचा खून

वैभवचे हिंगोली शहरातील एका तरुणीवर जीवापाड प्रेम होतं. दोघांनी पळून जाऊन लग्नही केलं होतं...

  • Share this:
परभणी, 5 नोव्हेंबर: दीड वर्षांपूर्वी मुलीची प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून जन्मदेत्या बापानं जावयाचा निर्घृण खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली शहरात कमला नगर भागात राहणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाची सासऱ्यानं हत्या केली. या प्रकरणी नरसी नामदेव पोलीस स्टेशनमध्ये (Hingoli Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हेही वाचा..पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका मिळालेली माहिती अशी की, वैभव वाठोरे (वय-21, रा.कमला नगर, हिंगोली) असं मृत तरुणाचं नाव आहे. वैभवचे हिंगोली शहरातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दीड वर्षांपूर्वी वैभव यानं तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता. परंतु त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. नंतर ते आपल्या मुलीला घरी घेऊन आले होते. त्यानंतरही सर्वांच्या संमतीने वैभव याचं संबंधित मुलीसोबत विवाह लावून देण्यात आला होता. परंतु मुलीचे वडील मधुकर लोणकर यांच्या मनात जावई वैभव याच्याविषयी राग कायम होता. यातूनच 30 ऑक्टोबर रोजी सासरे मधुकर यांनी त्याला फोन केला. 'कामानिमित्त बाहेर जायचे आहे. तू सोबत चल,' असं सांगितलं. त्यानंतर घरातून बाहेर पडलेला वैभव परत घरी आलाच नाही. 3 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील चांगेफळ शिवारात एका विहिरीमध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. वैभवच्या नातेवाईकांनी त्याची ओळख केली. त्यानंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सासऱ्यानंच जावयाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासगर यांनी दिली आहे. हेही वाचा...शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी, पुण्यातील घटना दरम्यान, चांगेफळ शिवारात एका विहिरीत वैभवचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये त्याचे सासरे मधुकर लोणकर यांचे नाव पुढे आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून एका आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झालं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: