मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपुरात कोरोनाला रोखण्यासाठी वापरणार 'मुंढे पॅटर्न', काय आहे वैशिष्ट्य!

पंढरपुरात कोरोनाला रोखण्यासाठी वापरणार 'मुंढे पॅटर्न', काय आहे वैशिष्ट्य!

शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.

शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.

'या ठिकाणी क्वारंटाइन लोकांची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. जर यातील कोणाला लक्षणे आढळली तर त्यांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.

पंढरपूर, 31 मे : पंढरपुरात कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता नागपूरचा 'मुंढे पॅटर्न' राबवला जात आहे. पंढरपुरात बाहेर गावातून आल्यास आता घरी जाण्याऐवजी त्यांची रवानगी इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाइन असलेल्या मठात होणार आहे. पंढरपूर नगरपरिषद आता याबाबत सतर्क झाली आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाइन करण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाइन करण्यावर भर दिला होता.  आता पंढरपुरात कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी हाच 'मुंडे पॅटर्न' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचा-वाईट होता लॉकाडाऊनचा चौथा टप्पा, प्रत्येक तासाची रुग्णांची आकडेवारी वाचून हादराल रेड झोन आणि कन्टेनमेंट झोनमधून जी लोकं पंढरपुरात येत आहेत. त्यांना होम क्वारंटाइन न करता थेट पंढरपुरातील मठात इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाइन करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली आहे. हेही वाचा-पोलीस ठाण्यात पोपटांना द्यावी लागली साक्ष, त्यानंतर घेतला 'हा' निर्णय पंढरपुरात आतापर्यंत 1694 लोकं बाहेरुन आले आहेत.  पंढरपूर नगरपरिषदेनं बाहेरून आलेल्या लोकांना इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाइन करण्यासाठी पंढरपुरातील 12 मठ पहिल्या टप्प्यात ताब्यात घेतले आहेत. या ठिकाणी क्वारंटाइन लोकांची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. जर यातील कोणाला लक्षणे आढळली तर त्यांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येत आहे, असंही अनिकेत मानोरकर यांनी सांगितलं. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Pandharpur, Tukaran mundhe, पंढरपूर

पुढील बातम्या