मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

परळीसाठीचे 100 कोटी कोणामुळे? मुंडे बहीण-भावामध्ये श्रेयवादावरुन जुंपली, जनतेत गोंधळ

परळीसाठीचे 100 कोटी कोणामुळे? मुंडे बहीण-भावामध्ये श्रेयवादावरुन जुंपली, जनतेत गोंधळ

'गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली पण... ' धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

'गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली पण... ' धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे जनतेत मात्र गोंधळ निर्माण झाला आहे.

    परळी, 17 जुलै : परळीतील (Parali News) दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात जुंपल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचं पत्रक काढून सांगितलं आहे. परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीत मुंडे भावा बहिणींमध्ये श्रेयवाद सुरू आहे. दोघांनीही या निधीवर दावा केला आहे. (Dhananjay Munde and Pankaja Munde) तर दुसरीकडे भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला. परळी शहरातील रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यावरुन या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून गडकरींचे आभार मानले आहेत. या अगोदर पाच वर्षे आपण सत्तेत नव्हतो इथले लोक प्रतिनिधी राज्य आणि केंद्रात सत्तेत होते तरी सुद्धा आपला निधी थांबवू शकले नाहीत. परळीत येणारा निधी कोणी अडवू शकलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं उपमुख्यमंत्री कोण होतं आणि मंत्री कोण होतात याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही. यामुळे आपल्या मतदारसंघातील विकासाचा पैसा कोणीही थांबू शकणार नाही. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला. काय आहे प्रकरण? परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यावरुन या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून गडकरींचे आभार मानले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Dhananjay munde, Pankaj munde

    पुढील बातम्या