• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • शिळरोड 3 दिवसांपासून पाण्याखाली; मुंब्रा-शिळ-पनवेल मार्ग अनिश्चित काळासाठी बंद

शिळरोड 3 दिवसांपासून पाण्याखाली; मुंब्रा-शिळ-पनवेल मार्ग अनिश्चित काळासाठी बंद

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ठाणे जिल्ह्यातील (Thane) मुंब्रा-पनवेल महामार्ग (Mumbra Panvel Highway) वाहतुकीसाठी बंद करण्यात (Closed for travel) आला आहे.

  • Share this:
ठाणे, 19 जुलै: ठाणे जिल्ह्यातील (Thane) मुंब्रा-पनवेल महामार्ग (Mumbra Panvel Highway) वाहतुकीसाठी बंद करण्यात (Closed for travel) आला आहे. मुंब्रा आणि शिळफाटा परिसरात पावसाचा जोर वाढतच चालल्याने पाणी रस्त्यावर आले असून शिळफाटा ते नेक्सट वर्ल्ड बिल्डिंग ते खान कम्पाउंड हा भाग पूर्णत: पाण्याखाली (Road under water) गेला आहे. मुंब्रा, शिळफाटा व पारसिक डोंगररांग इथं सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा पनवेल महामार्गावर सातत्यानं पाण्याचा प्रवाह वाहून येत आहे. नागरिकांनी गरज नसेल, तर घराबाहेर पडू नये असं आवाहन ठाणे पोलिस (Thane Police) नागरिकांना करत आहेत. आधीच उल्हास, त्यात ‘आषाढ’मास वाहतूक कोंडीमुळे सतत चर्चेत असलेला शिळ रोड या पावसाळ्यातही चांगलाच चर्चेत आला आहे. पण यावेळी ही चर्चा वाहतूक कोंडीसाठी नाही तर पावसाच्या पाण्यामुळे होत आहे. गेले ३ दिवस हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शिळरोड पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी छातीएवढे पाणी साचले आहे. हे वाचा -क्षणार्धात जमीनदोस्त झाली तीन मजली इमारत; पाहा भयानक घटनेचा LIVE VIDEO रविवारी सायंकाळी ४ नंतर तर शिळरोडवर प्रलंयकारी परिस्थिती पहायला मिळाली. अनेक गाड्या पाण्याखाली अडकून पडल्या होत्या. सोमवारीदेखील तीच परिस्थिती असून नाईस वर्ल्ड बिल्डिंग ते खान कम्पाउंड या भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शिळ आणि डायघर हा परिसर डोंगरांनी वेढलेला असून शिळरोडचे सिमेंटीकरण झाल्यामुळे इथल्या पाण्याचा निचराच होत नसल्याच स्थानिकांची तक्रार आहे. सिमेंटीकरण करताना डोंगरावरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरता असलेल्या ड्रेनेज लाईन आणि गटारे या पूर्णत: बंद झाली आहेत. तसंच या भागात अनधिकृत बांधकामेदेखील मोठ्या प्रमाणात वाढली असून या सर्वांचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच सोय नसल्यामुळे जेव्हा पाऊस थांबेल आणि आपोआप पाणी कमी होईल, तेव्हाच हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात इतके दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे रस्त्यांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनादेखील करवत नसल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
Published by:desk news
First published: