मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश

मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश

देवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली

  • Share this:

मुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.

देवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

कोण आहेत विनय कुमार चौबे ?

चौबे १९९५ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी

आय.आय.टी कानपूरमधून एम.टेक पदवी

उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदकानंही सन्मानित करण्यात आलंय.

नेदरलँड्समध्ये ते भारतीय दूतावासाचे संचालकही होते.

त्याआधी ते अकोला, रत्नागिरी आणि सोलापूर ग्रामीणचे एसपी होते.

मुंबईत परिक्षेत्र ९च्या डीसीपी पदावरही त्यांनी काम केलंय.

First published: April 7, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading