नालासोपारा इथं स्वच्छतागृहाची इमारत कोसळली, 5-6 जण अडकल्याची भीती

नालासोपारा इथं स्वच्छतागृहाची इमारत कोसळली, 5-6 जण अडकल्याची भीती

नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या संतोष भवन भागात स्वच्छतागृहाची इमारत कोसळली.

  • Share this:

पालघर, 10 एप्रिल :  मुबईला लागून असलेल्या नालासोपारा इथं स्वच्छतागृहाची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पूर्व इथं ही घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली 5-6 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुदैवानं अद्याप कोणतीही जिवीत हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सूरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या संतोष भवन भागात स्वच्छतागृहाची इमारत कोसळली. यामध्ये 5-6 लोक अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकांच्या मदतीनं एकाला ढिगाऱ्यातून काढलं आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत दिवसभरात 10 दगावले, रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू असून अजुन अधिकृतपणे किती लोक अडकले आहेत याची माहिती मिळू शकली नाही. अग्निशामक दलाचे कर्मचारी बचावकार्य करत आहेत.

हे वाचा : जनधनचे 500 रुपये आणायला गेल्या 39 महिला आणि 10 हजार दंड भरून परतल्या!

संपादन - सुरज यादव

First published: April 10, 2020, 7:34 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading