मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाण्यात मेट्रोचा चिक्कार फटका, अनेक ठाणेकरांचं लग्न होईना

ठाण्यात मेट्रोचा चिक्कार फटका, अनेक ठाणेकरांचं लग्न होईना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

ठाण्यात मेट्रो प्रकल्पामुळे अनेक तरुणांची लग्नच होत नाहीय. त्यामुळे हा विकास ठाणेकरांसाठी मारक ठरताना दिसतोय.

ठाणे, 11 ऑगस्ट : ठाणे शहराचा विकास व्हावा आणि मुंबईचा भार कमी व्हावा या दृष्टीने ठाण्यात Internal Metro म्हणजेच भुयारी मेट्रो प्रस्तावित करण्यात आलीय. पण जो मेट्रो रेल्वे मार्ग अजून कागदोपत्री देखील मांडण्यात आला नाही त्या मेट्रो मार्गामुळे ठाण्यातील जवळपास 1300 कुटुंबांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे यापैकी शेकडो कुटुंब बेघर झाली आहेत. तर काही कुटुंबावर बेघर होण्याबाबतची टांगती तलावर आहे. धक्कादायक म्हणजे अनेक तरुणांची या मेट्रो प्रकल्पामुळे लग्नच होत नाहीय. त्यामुळे हा विकास ठाणेकरांसाठी मारक ठरताना दिसतोय. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. परिणामी, अनेक ठाणेकर बेघर तर अनेकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. ठाण्यातील रहिवासी मधुकर गिजे यांच्या सारखीच हिंदू कॅालनीतील अनेक ठाणेकरांची परिस्थीती झालीय. हिंदू कॅालनीतील अनेक तरुण आहेत ज्यांची लग्न ठरत नाहीयेत, तरी काहींचे ठरलेली लग्न होत नाहीयत. कारण फक्त एवढंच की ते हिंदू कॅालनीत राहतात. या हिंदू कॅालनीतील बहुतांश इमारती या प्रस्तावित भुयारी मेट्रो प्रक्लापात गेल्याने इथल्या इमारतींचा पुर्नविकास होत नाहीय. ठाणे महानगरपालिका त्यांना बांधकामाकरता कोणती परवानगी देत नाहीय. परिणामी या हिंदू कॅालनीत अशा काही इमारती आहेत ज्या पुर्नविकासाकरता तोडण्यात आल्या आहेत पण पालिकेने परवानगी न दिल्याने बिल्डर इमारत बांधतही नाही आणि भाडेही देत नाहीय. याच भागात अल्हाद सोसायटीत राहणाऱ्या पाटणकर परिवाराचीही हीच व्यथा आहे. (सरकार जाताच जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, मानवाधिकार आयोगाची नोटीस, आाता पुढे काय?) ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी या विषयी कमालिची गुप्तता बाळगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कॅमेरासमोर बोलणं तर सोडाच, या विषयी बोलण्यासाठी कोणी भेटायला देखील तयार नाही. आणि बिल्डरांकडे गेलो तर तेच हात जोडून विनंती करु लागलेत. लवकर जर हा तिढा सुटला नाही तर त्यांच्या समोर कोणताच पर्याय उरणार नाही, अशी परिस्थिती आहे. दर या विषयी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडून यावर तोडगा काढणार असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलंय. आता तर या मेट्रो प्रक्लपामुळे एक नवीनच समस्या निर्माण झालीय. प्रक्लपाच्या नावाखाली बिल्डर आणि राजकीय नेते लोकांची फसवणूक करु लागलेत, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. विकासामुळे नागरिकांना एक नवीव जीवन मिळते. शहराला, गावांना, राज्याला एक नवीव दिशा मिळते. पण विकासच जर नागरिकांच्या मुळावर उठला असेल तर असा विकास काय कामाचा? असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत.
First published:

Tags: Marriage, Metro, Thane

पुढील बातम्या