मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बहुमत असूनही विस्तार का नाही? उपमुख्यमंत्री सुद्धा बिनाखात्याचेच, अजितदादादांचा शिंदे सरकारवर घणाघात

बहुमत असूनही विस्तार का नाही? उपमुख्यमंत्री सुद्धा बिनाखात्याचेच, अजितदादादांचा शिंदे सरकारवर घणाघात

 दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळेही निर्णय होत नाही. अनेकांना यांनी आश्वासनं दिली आहे. त्यामुळे विस्तार व्हायला कोणताच मार्ग नाही

दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळेही निर्णय होत नाही. अनेकांना यांनी आश्वासनं दिली आहे. त्यामुळे विस्तार व्हायला कोणताच मार्ग नाही

दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळेही निर्णय होत नाही. अनेकांना यांनी आश्वासनं दिली आहे. त्यामुळे विस्तार व्हायला कोणताच मार्ग नाही

    मुंबई, 02 ऑगस्ट : 'सरकारला आता  1 महिन्यापेक्षा जास्त झाला असूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. कशामध्ये अडलंय, कळायला मार्ग नाही. दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळेही निर्णय अडले आहे का? असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतेही खाते दिले नाही, असा दावाही अजितदादांनी केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. तसंच, राज्यात पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही अजितदादांनी केली. 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. आता सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. वास्तविक संपूर्ण बहुमत असतानाही निर्णय होतं नाही. दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळेही निर्णय होत नाही. अनेकांना यांनी आश्वासनं दिली आहे. त्यामुळे विस्तार व्हायला कोणताच मार्ग नाही. फक्त फक्त सर्व खात्यांचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडे आहे. उपमुख्यमंत्र्यांना कोणतेही खाते दिले नाही. मी बरीच वर्ष मंत्री राहिलो आहे.  मंत्रालयात अधिकाऱ्यांना विचारलं तर कुणालाच अधिकार दिलेले नाही, असा खुलासा अजितदादांनी केला. (पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश) 'प्रत्येक फाईली या मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. 42 मंत्र्यांना धरून विस्तार करावा लागत असतो. सर्व फायली क्लिअर कराव्या लागतात. मुख्यमंत्र्यांवर प्रचंड ताण असतो. पण सर्व फाईल मंत्रालयामध्ये तुंबलेल्या आहे. फायलींवर सह्या करून त्या कुणाकडे द्यायच्या याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. पण तसंही काही होत नाही.  उपमुख्यमंत्री यांनाही फाईलवर सही करण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही अजितदादांनी केली. मुख्यमंत्र्यांकडून कार्यकर्तांकडून सत्कार हे दुय्यम असला पाहिजे. शेतकरीच्या मदतची भूमिका घ्यावी. रात्री दहानंतर कोणतेही कार्यक्रम घेऊ नये असा नियम आहे. कार्यकर्त्याला आवर घालण्याची गरज आहे. पण मुख्यमंत्री शिंदे स्वतः च नियम मोडत आहे. तर पोलीस अधिकारी काय करणार, असा टोलाही अजितदादांनी शिंदे लगावला. अतिविष्टी भागात  ओला दुष्काळ घोषित केला पाहिजे.अतिवृषटीभागा मध्ये विद्यार्थीची फिस माफ करावी, खरीप पिकाला प्रती हेक्टरी 75 हजार द्यावी.फळबाला प्रति हेक्टर 3 लाखाची मदत तत्काळ दिली पाहिजे. विकास कामाला दिलेली स्थगिती तत्काळ उठवावी अशी मागणी केली, अशी मागणीही अजितदादांनी केली. (क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार) 'राज्यात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाडा विदर्भामध्ये मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारकडून हवी तशी मदत देत नाही. सोयाबीनवर गोगल गायीने हल्ला केली आहे. राज्यसरकारने केंद्राच्या टीमला अजूनही निरोप नाही. 10 लाख पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाला आहे. कृषी विभागाने सुचना देने गरजेचे आहे. पंचनामे अजुनही झाले नाही. घरतुटीला 4 लाख मदत दिली आहे पण ही मदत तुटपुंजी आहे.  पशुधन नुकसानला अजून मदत नाही. घरगुती सामानाचे अतोनात नुकसान झाले आहे, असंही अजितदादा म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या