मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है' अजितदादांनी सभागृहात उडवली खिल्ली

'दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है' अजितदादांनी सभागृहात उडवली खिल्ली

 'मुबंई बँकेत घोटाळे केलेल्यांना तुरुंगात टाका. पेन ड्राइव्ह असे किती तरी आम्ही देऊ शकतो.

'मुबंई बँकेत घोटाळे केलेल्यांना तुरुंगात टाका. पेन ड्राइव्ह असे किती तरी आम्ही देऊ शकतो.

'मुबंई बँकेत घोटाळे केलेल्यांना तुरुंगात टाका. पेन ड्राइव्ह असे किती तरी आम्ही देऊ शकतो.

मुंबई, 24 मार्च : मजूर प्रकरणामुळे भाजपचे (bjp) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) अडचणीत सापडले आहे. आज विधान परिषदेत याच मुद्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी, 'दरेकर साहब को गुस्सा क्यु आता है' असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खिल्ली उडवली.

प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेत विश्वासघात केल्याचे अहवालात आले आहे. बँकेवर प्रशासक नेमण्याची गरज आहे. प्रवीण दरेकर यांना सभागृहातून अपात्र का केले जाऊ नये, अशी मागणीच शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

तसंच, 'मुबंई बँकेत घोटाळे केलेल्यांना तुरुंगात टाका. पेन ड्राइव्ह असे किती तरी आम्ही देऊ शकतो. विनोद तावडे यांनी हा भ्रष्टाचार बाहेर आणला होता. EWO कडे ही तक्रार गेली आहे, असा आरोपच मनीषा कायंदे यांनी केला.  त्यामुळे भाजपच्या आमदारांनी एकच गोंधळ घातला. शिवसेना आणि भाजप सदस्य एकमेकांसमोर बाचाबाची झाली. यावर लगेच प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं.

(PM Kisan योजनेत पुन्हा करण्यात आला बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती)

'विरोधीपक्ष नेत्यांचे नाव घेतांना नोटीस द्यायला हवी. माझ्याकडे महाराष्ट्रातील नेत्यांची नावे आहेत. आम्ही काही केले असेल तर जाऊ आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत, असं उत्तर प्रवीण दरेकर यांनी दिली.

त्यानंतर अजित पवार यांनी शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांची बाजू घेत दरेकरांना टोला लगावला. 'दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है. मी नितीन गडकरी,विनोद तावडे यांना सभागृहात काम केलेले पाहिले आहे. सहकारी कारखाण्यात दरोडे घातल्याचे बोलले जात आहे, असं म्हणत दरेकरांना टोला लगावला.

(Women's World Cup : पाकिस्ताननं दिला टीम इंडियाला धोका, मिताली राजची काळजी वाढली)

'मराठवाडा, विदर्भ कोकण विभागाला निधी कमी देण्याची भूमिका आमची नाही. विकास महामंडळाचा कालावधी वाढवला नसला तरीही विकास निधी वाढ देण्यात आली आहे.. विदर्भाला 23 टक्के ऐवजी 26 टक्के,  मराठवाडा 19 टक्के विकास निधी दिला आहे. उत्तर महाराष्ट्र विकास महामंडळ तयार करण्याची भूमिका आहे. कोकणचा निधी कमी केलेला नाही, असंही स्पष्ट करत भाजपला फटकालं.

First published:

Tags: Ajit pawar, Pravin darekar