मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चहावाला होऊ शकतो PM; तर इंजिनिअर, बीटेक झालेल्या तरुणींनीही स्टेशनवर सुरू केली चहाविक्री

चहावाला होऊ शकतो PM; तर इंजिनिअर, बीटेक झालेल्या तरुणींनीही स्टेशनवर सुरू केली चहाविक्री

उच्चशिक्षित तरुणी रेल्वे स्टेशनवर काय विकतायेत चहा?

उच्चशिक्षित तरुणी रेल्वे स्टेशनवर काय विकतायेत चहा?

उच्चशिक्षित तरुणी रेल्वे स्टेशनवर काय विकतायेत चहा?

    भोपाळ, 25 मार्च : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे (Corona) उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. याचा परिणाम नोकरी (Jobs), रोजगारावर झाला. अपेक्षित पगार मिळत नसल्याने अनेकांनी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा किंवा दुसरीकडे नोकरी शोधण्याचा पर्याय निवडला. परिणामी आज अनेक उच्चशिक्षित युवक व्यवसायात उतरताना दिसत आहेत. एमबीए, इंजीनिअरिंग केलेले युवक बिर्याणी, चहा विक्रीचा व्यवसाय करत आहेत; पण आता उच्चशिक्षित युवतींनीदेखील नोकरीऐवजी उद्योग, व्यवसायात पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे.

    बीटेक, बीएस्सी उत्तीर्ण युवती सध्या भोपाळ रेल्वे स्टेशनवर (Bhopal Railway Stations) चहा (Tea) विक्री करत आहेत. इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या युवती चहा विक्री का करतील, असा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल; पण त्यामागे काही कारणं आहेत. या उच्चशिक्षित युवती एका प्रसिद्ध चहा कंपनीसाठी (Tea Company) काम करतात. या युवतींना विक्री परवाना मिळालेला आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

    अहमदाबादमधले प्रफुल्ल बिलोरे कॉलेजमध्ये नापास झाले. त्यानंतर त्यांनी चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज देशभरात त्यांच्या अनेक फ्रॅंचायझी असून, त्यांचा व्यवसाय कोट्यवधींची उलाढाल करत आहे. प्रफुल्ल यांनी नापास झाल्यामुळे चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता; पण मध्य प्रदेशातल्या भोपाळ रेल्वे स्टेशनवर चहाविक्री करणाऱ्या युवती उच्चशिक्षित (High Educated) आहेत. त्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. भोपाळ रेल्वे स्टेशनवर पश्चिम-मध्य रेल्वेने एक नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचं नाव `ऑन पेमेंट टी` (On Payment Tea) असं आहे. या उच्चशिक्षित मुली एका प्रसिद्ध चहा कंपनीत नोकरी करतात. त्यांना या स्टेशनवर चहाविक्रीचा परवाना मिळालेला आहे. या युवतींपैकी बहुतांश युवती या बीटेक किंवा बीएस्सी उत्तीर्ण आहेत. काही युवतींनी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. उच्चशिक्षित मुली चहाविक्री करत असलेलं भोपाळ हे देशातलं पहिलं रेल्वे स्टेशन ठरलं आहे.

    भोपाळ स्टेशनवर कधी गेलात, तर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर या उच्चशिक्षित तरुणी थर्मासमधून चहाची विक्री करताना दिसतील. लाल रंगाचा टी-शर्ट आणि डोक्यावर टोपी परिधान केलेल्या या युवती तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतील. या युवतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतात. हात आणि युनिफॉर्म स्वच्छ करण्यासाठी तेथे सॅनिटायझिंग मशीन बसवण्यात आलं आहे. या युवतींना कोणीही त्रास देऊ नये, त्यांच्यासोबत गैरवर्तन करू नये, यासाठी त्यांना वॉकी-टॉकी सेट (Walkie-talkie set) देण्यात आला आहे. तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या युनिफॉर्ममध्ये छुपा कॅमेराही बसवण्यात आला आहे.

    हे ही वाचा-Rape is Rape, पुरुषाने किंवा नवऱ्याने केलेली बळजबरी म्हणजे बलात्कारच - हायकोर्टाची टिप्पणी

    हा चहा दर्जेदार असतो. `ऑन पेमेंट टी सुविधेत चहाचा दर्जा मशीनच्या माध्यमातून तपासला जातो. यासाठी सेन्सर असलेल्या मशीनचा वापर होतो. तसंच चहा बनवण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर केला जातो,` अशी माहिती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. `चहा कंपनीशी संलग्न असणाऱ्या या युवतींकडे विक्री परवाना आहे,` असं भोपाळ रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुभेदार सिंग यांनी सांगितलं.

    First published:
    top videos

      Tags: Bhopal News, Madhya pradesh, Tea