मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: मुंबईत मुसळधार पाऊस; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, समुद्राला मोठी भरती

VIDEO: मुंबईत मुसळधार पाऊस; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, समुद्राला मोठी भरती

अंधेरी सबवेमध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. (Mumbai Rain)

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 09 ऑगस्ट : मागील 4 ते 5 दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. शहर आणि परिसरात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून समुद्रालाही मोठी भरती आली आहे. Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराची धास्ती पाणी पातळी तब्बल 13 फुटांनी वाढ वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी सबवे येथे 2.0 फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे. पावसामुळे मुंबईतील मरीन ड्राईव्हला मोठी भरती आली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. Weather Forecast: कुठे रेड, तर कुठे ऑरेंज अलर्ट; मुंबई पुण्यासह याठिकाणी आजही मुसळधार पाऊस राज्यातील पावसाची स्थिती - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील 3-4 दिवसांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. अशात आता आजही अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आजचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे.
First published:

Tags: Mumbai rain, Rain updates

पुढील बातम्या