मुंबई, 02 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या निर्धार करून आलेले आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) गेल्या 10 दिवसांपासून जेलमध्ये मुक्कामी आहे. आता राणा दाम्पत्यांना मुंबई महापालिकेनं दणका दिला आहे. राणा दाम्पत्यांच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले असून कारवाईची नोटीस बजावली आहे.
नवनीत राणा यांच्या मुंबई खार येथील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम केले असल्याची पालिकेने नोटीस दिली आहे. राणा दाम्पत्य जेलमध्ये असताना पालिकेने दारावर नोटीस लावली आहे. 353 अंतर्गत तोडक कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस पालिकेनं राणा दाम्पत्याला बजावली आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा रहात असलेल्या सोसायटीच्या पदाधिकारी व उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांचे नावे नोटीस पाठविली आहे.
राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढला
दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आजदेखील दिलासा मिळालेला नाही. राणा दाम्प्त्याच्या जामीनाबाबत आज सुनावणी होणार होती. पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची पुढील सुनावणी 4 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ऑर्डरची कॉपी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही निकाल ऐकवू शकत नाही, असं न्यायाधीशांनी आज कोर्टात सांगितलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या अक्षय्य तृतीया निमित्ताने सुट्टी असणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता 4 मे रोजीच सुनावणी होणार आहे. परिणामी राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम हा आणखी दोन दिवसांनी वाढला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.