मुंबई, 5 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शपथविधीला एक महिन्यापेक्षा जास्तचा काळ झाला आहे, पण राज्यात अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत.
दरम्यान आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत केसरकरांनी नारायण राणे यांचाही समाचार घेतला. सुशांतसिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली. यात नारायण राणेंचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगण्यात आलं होतं. त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी व ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. नंतर त्यांची भेट झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते. परंतु त्यानंतर १२ आमदारांचे निलंबन झाले आणि राणेंना केंद्रात घेतले गेले. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. ही गोष्ट दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात रश्मी ठाकरेही होत्या, असं म्हणज केसरकरांनी मोठा खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊ, असंही उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले होते. पण यावर भाजप तयार झाली नाही, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंना अडचणीत आणलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.