मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष नाही, थातूरमातूर मलमपट्टी केली जाते; उद्धव ठाकरेंची केंद्रावर टीका

देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष नाही, थातूरमातूर मलमपट्टी केली जाते; उद्धव ठाकरेंची केंद्रावर टीका

Uddhav Thackeray Interview: अग्नीवीर योजनेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्या डोक्यात 'अग्नी'. म्हणूनच ते 'वीर' बाहेर पडले. रस्त्यावर उतरले. त्यांचे म्हणणे आहे, आम्हाला तुम्ही टेंपररी बेसिसवर ठेवताय.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 27 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. तसे केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप कशाप्रकारे गैरवापर वापर करते यावरही त्यांनी भाष्य केलं. सामनातील उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला त्यात त्यांनी अनेक मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. देशात आज अनेक प्रश्न आहेत. महागाई वाढत आहे, बेरोजगारांची संख्या वाढतेय. या महत्त्वाच्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही, थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते. मीही मुख्यमंत्री होतो. आज नाहीय, पण तुमच्यासमोर पहिल्यासारखा बसलोय. काय, फरक काय पडला? सत्ता येते आणि जाते. मग सत्ता परत येते. अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, 'सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.' देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत. सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी आहे. अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवारांनी शिवसेना संपवली; बंडखोरांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

अग्नीवीर योजनेवरुन केंद्रावर निशाणा

अग्नीवीर योजनेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्या डोक्यात 'अग्नी'. म्हणूनच ते 'वीर' बाहेर पडले. रस्त्यावर उतरले. त्यांचे म्हणणे आहे, आम्हाला तुम्ही टेंपररी बेसिसवर ठेवताय. आयुष्य, संसार हा कायमचा असतो. टेंपररी बेसवर आम्हाला रोजगार देणार असाल तर पुढे काय होणार, असा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला कंत्राटी पद्धत हवी ना, मग करायचेच आहे तर सगळीकडेच कंत्राटी पद्धत करा. राज्यकर्ते पण कंत्राटी आणा. सगळ्यासाठीच आपण मग एक एजन्सी नेमू आणि ठेवू कामाला.

'आधी भाजप नको असे सांगणारे हेच लोक', उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह बंडखोरांना केलं उघड

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय का? या प्रश्नावर ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल काही वेळा न्यायालयानेही आपली मते नोंदवली आहेत. अलीकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांचे मंत्री मनीष सिसोदिया यांना अटक होण्याची शक्यता आहे. आधी अटक, मग आरोप ठरवतील आणि कालांतराने त्यातनं ते सुटतात. तोपर्यंत तुम्ही त्यांचे आयुष्य बरबाद केलेलं असतं. मात्र कुणाचे आयुष्य बरबाद करून कोणाला सुख लाभत असेल असे मला वाटत नाही. अशी लोकं कधी सुखात राहू शकतील आणि शकतात यावर माझा विश्वास नाहीय. त्याच्यामुळे ठीक आहे, लोकशाही आहे.

First published:

Tags: Modi government, Uddhav Thackeray (Politician)