मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गणपती बाप्पा मोरया, लाडक्या बाप्पाचं आज आगमन, लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन VIDEO

गणपती बाप्पा मोरया, लाडक्या बाप्पाचं आज आगमन, लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन VIDEO

लालबागच्या राजाच्या मंडपात एका महिला भाविकाला सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे.

लालबागच्या राजाच्या मंडपात एका महिला भाविकाला सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे.

यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 31 ऑगस्ट : आज गणेश चतुर्थी. (Ganesh chaturthi) गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात आज घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आजपासून महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे.

गेली दोन वर्षे कोविड संसर्ग निर्बंधांमुळे गणेशोत्सवावर मर्यादा होती. पण आता सर्व निर्बंध हटवले गेल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन होतं आहे. तर मुंबईतील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या ( Lalbaugcha Raja) दर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.

पहाटे 5 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आलीय. त्यानंतर पहाटे ६ वाजता लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आल आहे.

तर मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये आज पहाटेच गणेश आरती करण्यात आली आहे.

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती असलेल्या गणेशाचे आगमन यंदा 31 ऑगस्टला लाडक्या भक्तांकडे होणार आहे.

(Ganesh Chaturthi 2022: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा, वाहतुकीमध्ये आहेत मोठे बदल)

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त याविषयी जाणून घेऊया.

गणपतीचे आगमन -

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या चतुर्थीला सिद्धी विनायक व्रत असेही म्हटले जाते. या दिवशी घरोघरी गणरायाचे आगमन होते आणि अबाल-वृद्ध भक्तीभावाने श्रीगणेशाच्या मूर्तीची पूजा करतात. या वर्षी महिन्याच्या शेवटी बुधवारी 31 ऑगस्टला, भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी आहे. म्हणजेच यंदा 31 ऑगस्टला गणपती बाप्पा सर्वत्र विराजमान होतील. बुधवारी गणेश चतुर्थी आल्याने या व्रताचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण गणपती बाप्पा स्वतः बुधवारचा देव आहे, अशी मान्यता आहे.

शुभ मुहूर्त आणि वेळा -

भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी म्हणजेच गणेश चतुर्थी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल. तर समाप्ती भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी होईल. गणेश चतुर्थीला रवी योग आहे. या दिवशी गणपती बाप्पा आपल्यासोबत शुभ रवियोग घेऊन येणार आहेत. या योगामध्ये सर्व अशुभ योगांचे प्रभाव नष्ट करण्याची ताकद असते. म्हणजेच सर्व दु:खे, विघ्न, अडचणी दूर करून भक्तांना प्रसन्न करण्यासाठी गणरायाचे आगमन होणार आहे.

First published:

Tags: Lokmat news