मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महत्त्वाची बातमी! कोपरी पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; 2 दिवस करा या पर्यायी मार्गांचा वापर

महत्त्वाची बातमी! कोपरी पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; 2 दिवस करा या पर्यायी मार्गांचा वापर

फाईल फोटो

फाईल फोटो

पुलावर गर्डर टाकण्याचं काम शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. यावेळी नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  Kiran Pharate

ठाणे 17 नोव्हेंबर : मुंबई-ठाणे दरम्यान कोपरी पूलाच्या रुंदीकरणाची कामं सध्या सुरु आहे. रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक शनिवारी आणि रविवारी बंद करण्यात येणार आहे. पुलावर गर्डर टाकण्याचं काम शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. यावेळी नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल.

Video : मुंबईतील 100 वर्ष जुनं इराणी हॉटेल होणार बंद, राजेश खन्नांसह अनेकांचा होता अड्डा

वाहनांसाठी पर्यायी मार्ग -

या काळात नाशिक-घोडबंदराकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना तीन हात नाका इथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककडून येणारी वाहनं साकेतकडून क्रिक नाका, शिवाजी चौकातून ठाणे-बेलापूर मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर, ठाण्यातून मुंबईकडे जाणारी वाहने जी. पी. कार्यालय, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोडने क्रिक रोडमार्गे ठाणे-बेलापूर रस्त्यावर वळवली जातील. घोडबंदरकडील वाहने मॉडेला चेकनाकामार्गे मुंबईत जातील.

पुलाचं काम शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री होणार आहे. या कामामुळे नाशिक-मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गाने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद असेल. ही वाहनं खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन महापे मार्गे रबाळे-ऐरोली पुलाकडे जातील.

Measles Disease in Mumbai : कोरोनानंतर मुंबईत गोवरचं थैमान, आतापर्यंत 7 बालके दगावली तर 61 रुग्णालयात

तर, घोडबंदर मार्गाने ठाणे शहरातून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजीवडा पुलावर उजवे वळण घेऊन गोल्डन क्रॉस माजिवाडा पुलाखाली प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहनं तत्त्वज्ञान सिग्नल - माजीवडा पुलावरून खारेगाव टोलनाका इथून गॅमन चौक-पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन महापेमार्गे रबाळे-ऐरोली पुलामार्गे मुंबईकडे जातील. ठाणे-मुंबई शहराच्या दरम्यान असलेल्या अरुंद कोपरी पुलामुळे शहरात वाहतूककोंडी निर्माण होत होती. यामुळे या पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे.

First published:

Tags: Thane, Traffic