मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मला काही झालं तरी...' संभाजीराजेंच्या भाषणानंतर पत्नीच्या डोळ्यात अश्रू, VIDEO

'मला काही झालं तरी...' संभाजीराजेंच्या भाषणानंतर पत्नीच्या डोळ्यात अश्रू, VIDEO

 'मी केलेलं हे उपोषण माझ्या निर्णयाने कदाचित माझ्या घरच्यांना हा निर्णय पटलेला नाही, पण मी उपोषण करतोय.

'मी केलेलं हे उपोषण माझ्या निर्णयाने कदाचित माझ्या घरच्यांना हा निर्णय पटलेला नाही, पण मी उपोषण करतोय.

'मी केलेलं हे उपोषण माझ्या निर्णयाने कदाचित माझ्या घरच्यांना हा निर्णय पटलेला नाही, पण मी उपोषण करतोय.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 26 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje)  मुंबईत उपोषणाला बसले आहे. यावेळी संभाजीराजे यांनी जोरदार भाषण करत सरकारला इशारा दिला आहे. 'मला काहीही झालं तर चालेल पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे' असं संभाजीराजे म्हणताच  संभाजीराजेंच्या पत्नी संयोगीता राजे यांना अश्रू अनावर झाले आहे. (Sambhaji Raje hunger strike for Maratha reservation)

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. संभाजीराजे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत आहे. यावेळी कार्यकर्त्याच्या गर्दीत संभाजीराजे यांच्या पत्नी ससंयोगीता राजे या सुद्धा खाली बसलेल्या आहे.

संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत भाषण करून धीर दिला. 'मी केलेलं हे उपोषण माझ्या निर्णयाने कदाचित माझ्या घरच्यांना हा निर्णय पटलेला नाही, पण मी उपोषण करतोय. मला काहीही झालं तर चालेल पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे' असं म्हणत संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. यावेळी पत्नी संयोगीता राजे यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कार्यकर्त्यांनाही गहिवरून आलं. यावेळी, मराठा बांधवांनी आक्रमकपणे भाषणं केली.

दरम्यान, उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. समाजाला वेठीस धरू नये म्हणून मी एकट्यानं आंदोलन करायचा निर्णय घेतला आहे. मला सपोर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना पाठिंबा असं खासदार संभाजीराजे म्हणाले.

मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय झाला. यावरुन संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला एक सवाल केला आहे.

संभाजीराजे म्हणाले की, 'माझा कायदेशीर अभ्यास तसा झालेला नाहीये पण मला असं वाटतं एक मागासवर्ग आयोग असताना तुम्ही स्पेशल मराठा समाजासाठी एक वेगळा आयोग तयार करता येतो का? हा प्रश्न आहे. कायदेशीर सल्ला याबाबत घेणं आवश्यक आहे. केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी असं स्टेटमेंट यायला नको. माझ्या माहितीप्रमाणे एखादा आयोग नेमला असतो तेव्हा दुसरा आयोग तेथे स्थापण करणं हे कायद्यात, घटनेत कुठेही लिहिलेलं दिसत नाही.'

First published:

Tags: Maratha reservation